NCP Crisis : शरद पवारांची मोठी खेळी; निवडणूक आयोगातील सुनावणीआधीच उचललं मोठं पाऊल

Sharad Pawar VS Ajit Pawar: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
Sharad Pawar and Ajit Pawar
Sharad Pawar and Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Delhi News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद थेट निवडणूक आयोगात पोहाेचला आहे. यावर आज दुपारी चार वाजता सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीला पक्षाध्यक्ष शरद पवार हे स्वतः उपस्थित राहणार आहेत, पण या सुनावणीआधीच शरद पवारांनी मोठं पाऊल उचललं आहे.

Sharad Pawar and Ajit Pawar
Satara Guardian Minister News : शंभूराज देसाईंबाबत अधिकाऱ्यांसह जनतेतही नाराजी; सातारचे पालकमंत्री बदलणार..?

अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना यासंदर्भातील सूचना द्याव्यात, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. आता या याचिकेवर 9 ऑक्टोबरला सुनावणी पार पडणार आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगातील सुनावणीआधी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने जोरदार तयारी केली असून, शरद पवार यांनी सुनावणीच्या एक दिवस अगोदर दिल्लीत विस्तारित कार्यसमितीची बैठक घेतली. या बैठकीला 24 राज्यांचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित असल्याचे सांगण्यात आले, तर दोन्ही गटाने आयोगात जवळपास आठ ते नऊ हजार कागदपत्रे सादर केली आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा ? याबाबत निवडणूक आयोगासमोर फैसला होणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

Sharad Pawar and Ajit Pawar
Satara Guardian Minister News : शंभूराज देसाईंबाबत अधिकाऱ्यांसह जनतेतही नाराजी; सातारचे पालकमंत्री बदलणार..?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com