Dr. Ashok Jivtode, Chandrapur. Sarkrnama
विदर्भ

Dr. Ashok Jiwatode News : ओबीसी, स्वतंत्र विदर्भ व बहुजन समाजासाठी अखेरच्या श्वासापर्यंत कार्य करीत राहणार...

सरकारनामा ब्यूरो



I have been working absolutely in the social sector : मी माझ्या आयुष्याच्या कारकिर्दीत सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना आजवर ओबीसी चळवळ, विदर्भ विकास चळवळ व शैक्षणिक तथा सामाजिक क्षेत्रात निरपेक्षपणे काम करीत आलो आहे, हाच बाणा कायम ठेवत ओबीसी, स्वतंत्र विदर्भ व बहुजन समाजासाठी अखेरच्या श्वासापर्यंत कार्य करीत राहणार आहे, अशी ग्वाही विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांनी दिली. (will continue to work for the society till last breath)

एका टोकाला आयुष्य जगण्याची सुरुवात करून दुसऱ्या टोकाला ते संपवणं येवढंच उद्दिष्ट ज्यांचं नसतं, तर ज्या समाजात आपण जन्मलो, घडलो, त्या समाजाचंही आपण काही देणं लागतो आणि ते दिलंच पाहिजे, या भावनेतून करणार करणारं कुटुंब म्हणजे जिवतोडे कुटुंब. या कुटुंबातील डॉ. अशोक जिवतोडे आज शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत.

उद्या (ता. ११ जून) वाढदिवसाचे औचित्य साधून अनौपचारिक बैठकीत संवाद साधताना डॉ. अशोक जिवतोडे बोलत होते.ते म्हणाले, माझे वडील शिक्षण महर्षी स्व. श्रीहरी जिवतोडे गुरुजी यांनी पूर्व विदर्भात शिक्षणाची दारे बहुजन समाजाकरिता उघडी करून दिली. त्यामुळे गेल्या सहा दशकांत आमच्या परिवाराला पूर्व विदर्भात शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून काम करता आले.

यापुढे जाऊन सामाजिक चळवळीत काम करून आम्ही समाजाचे देणं फेडण्यासाठी काम केले आहे. सामाजिक क्षेत्रात ओबीसी, विदर्भ विकास चळवळ राबविताना येथील बहुजन समाजाच्या मूळ प्रश्नांना हात घालण्याचे काम करता आले. शासन दरबारी रेटा लावून अनेक प्रश्न मार्गी लावले. ओबीसी हितासाठी अनेक शासन निर्णय निघाले. ओबीसी समाजात जाणीव जागृती झाली. याचे फलित आम्ही राबविलेल्या चळवळीला जाते.

स्वतंत्र विदर्भ विकास चळवळीत शिक्षण महर्षी स्व. जिवतोडे गुरुजी यांच्यापासून आम्ही सक्रिय आहोत. विदर्भ राज्य व्हावे, ही आमची मागणी आहे. मात्र तोपर्यंत वैदर्भीय जनतेचा विकास होत राहावा, यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. पत्र-व्यवहार, निवेदने, आंदोलने, धरणे, रास्ता रोको, मोर्चा, बैठका, अधिवेशने ही आमच्या चळवळीची शस्त्रे राहिली आहेत.

८ डिसेंबर २०१६ ला नागपूर येथील अधिवेशनावर काढलेला ओबीसी समाजाचा भव्य ‘न भूतो, न भविष्यति, मोर्चा काढला होता. तो ओबीसी आंदोलनातील महत्त्वाचा टप्पा होता. या मोर्चाची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना केली. हे या आंदोलनाचे फलित म्हणावे लागेल. देशभरातील विविध राज्यांत देशव्यापी अधिवेशनाच्या माध्यमातून ओबीसी चळवळीला मजबूत करण्याचे काम काम आजही सुरू आहे, असे डॉ. जिवतोडे यांनी सांगितले.

तसेच स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे याकरिता विदर्भातील विविध जिल्ह्यात विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांचे नेतृत्वात यशस्वी जनमत चाचणी घेतली होती. ती अलीकडल्या काळातील स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे, याकरिता केलेले मोठे आंदोलन म्हणावे होते. मंडल आयोगाच्या वेळेस तत्कालीन सरकारने ओबीसींना शैक्षणिक, राजकीय आणि नोकरीत आरक्षण दिले. महिलांना राजकारणात ५०% आरक्षण मिळाले, त्यामुळे ओबीसी चळवळ राबविताना त्यांचीही प्रेरणा आहेच.

भारतीय जनता पक्ष असो की राष्ट्रवादी काँग्रेस असो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असो सर्व पक्षांसोबत आमचे संबंध सलोख्याचे राहिले आहेत. आमचा उद्देश हा केवळ विदर्भ प्रदेशाचा व येथील ओबीसी व बहुजन जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा, हाच राहिला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष हे आम्हाला समाजहित जपण्याचे साधन राहिले आहे, असेही डॉ. जिवतोडे म्हणाले.

ओबीसी (OBC) व बहुजन समाज हा विदर्भातील जडणघडणीचा कणा आहे. या समाजाचे उत्थान झाले पाहिजे, या समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे. येथील जल, जंगल, जमीन, कोळसा, वीज याचा लाभ येथील स्थानिक जनतेला व्हायला पाहिजे. येथे पर्यावरण पूरक उद्योग व्यवसाय वाढावे, स्थानिक युवकांना रोजगार मिळावा, राहणीमान
उंचावे, ही आमची आग्रही भूमिका आहे.

शैक्षणिक संस्थेत आत्महत्याग्रस्त, पूरग्रस्त, कोरोनाने मृत, आदी पालकांच्या पाल्यांना मोफत शिक्षणाची दारे उघडी आहेत. अनेक गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतल्या गेले आहेत. सोबतच सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा, रक्तदान शिबिरे, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती कार्यक्रम, वृद्धाश्रमांना मदत, रुग्णांना मदत असे समाजपुरक अभियान सुरू असतात, ते अविरत सुरू राहतील. म्हणून आता उर्वरित आयुष्य हे ओबीसींचे उत्थान, विदर्भाच्या (Vidarbha) विकासासाठी व बहुजन समाजासाठी कार्य करीत राहू, हा प्रण केला असल्याचे विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे (Dr. Ashok JIvtode) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT