J. P. Nadda, Devendra Fadnavis, Chandrasekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis : नड्डांच्या सभेला फडणवीसांची अनुपस्थिती : बावनकुळे म्हणाले, ‘फडणवीसांचे टेंपरेचर १०३ वर...’

देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती रविवारी रात्री एकच्या सुमारास अचानक बिघडली.

सरकारनामा ब्यूरो

चंद्रपूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांची आज (ता. २ जानेवारी) चंद्रपूरमध्ये सभा झाली. मात्र, या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अनुपस्थित होते. त्यांच्या या अनुपस्थितीची चर्चा चंद्रपूरसह विदर्भात रंगली होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आपल्या भाषणात फडणवीस सभेला न येण्याचे कारण सांगितले. (Due to deterioration of health Devendra Fadnavis absent from J. P. Nadda's Sabha)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती बिघडल्यामुळे ते चंद्रपूरमधील नड्डा यांच्या सभेला अनुपस्थित होते, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिली. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती रविवारी रात्री एकच्या सुमारास अचानक बिघडली. त्यांची प्रकृती सभेला येण्यालायक नाही, त्यामुळे ते पक्षाचे अध्यक्ष नड्डा यांच्या सभेला येऊ शकले नाहीत.

चंद्रपूरमधील सभेला फडणवीस यांची शुभेच्छा दिल्या आहेत. फडणवीस यांनी चंद्रपूरमधील सभेला येण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र, त्यांचे तापमान हे १०३ डिग्रीपर्यंत गेलं, त्यामुळे ते नड्डा यांच्या सभेला येऊ शकले नाहीत. त्यांनी तशी विनंती करून क्षमाही मागितली आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

भारतीय जनता पक्षाकडून मिशन लोकसभा सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी ‘लोकसभा प्रवास योजना’ जाहीर करण्यात आली आहे. त्याअंतर्गत नड्डा हे चंद्रपूरमध्ये आले होते. नड्डा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री रावसाहेब दानवे यांसारखे दिग्गज नेते असतील, असे सांगण्यात येत होते. मात्र, फडणवीसांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. मात्र, बावनकुळे यांनी फडणवीस सभेला न येण्याचे कारण आपल्या भाषणातून सांगितले, त्यामुळे फडणवीस यांच्या अनुपस्थितीमुळे रंगलेली चर्चाही आता थांबली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT