Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

Search Of Bungalow for Ajit Pawar: शासनाचे आदेश धडकले, अन् सुरू झाला अजित पवारांच्या बंगल्यासाठी जागेचा शोध !

Ajit Pawar Bungalow News: अजित पवार यांच्यासाठी स्वतंत्र बंगला उपलब्ध नाही.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics : राज्याला प्रथमच दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत. त्यामुळे काही बाबतीत प्रशासनाचा चांगलाच गोंधळ उडतो आहे. नागपुरात मुख्यमंत्र्यांसाठी रामगिरी आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी देवगिरी बंगला आहे. अजित पवार यांच्यासाठी स्वतंत्र बंगला उपलब्ध नाही. त्यामुळे पवारांसाठीही स्वतंत्र बंगला तयार करण्यात येणार आहे. (Separate bungalow is not available for Ajit Pawar)

शासनाकडून तसे आदेश आले असून बंगला तयार करण्यासाठी जागेचा शोध सुरू झाला आहे. सिव्हिल लाइन्स परिसरात त्यांच्यासाठी बंगला तयार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड केले. आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ते सामिल झाले. यावेळीही त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद देण्यात आले.

त्यामुळे राज्यात उपमुख्यमंत्र्यांची दोन पदे झाली. नागपुरात (Nagpur) मुख्यमंत्र्यांसाठी रामगिरी हे शासकीय निवासस्थान आहे. तर उपमुख्यमंत्र्यांसाठी देवगिरी बंगला आहे. हा बंगला देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांसाठी एकच शासकीय निवासस्थान आहे. दोन उपमुख्यमंत्री झाल्याने प्रशासनाची मोठी अडचण झाली आहे. राष्ट्रपती दौऱ्याच्या वेळी त्यांच्यासाठी रविभवन येथील एक कॉटेज राखीव ठेवण्यात आले होते.

राज्याच्या (Maharashtra) इतिहासात प्रथमच दोन उपमुख्यमंत्र्यांची पदे निर्माण झाली. त्यामुळे नव्याने उपमुख्यमंत्री पद देण्यात आलेल्या अजित पवारांसाठी (Ajit Pawar) स्वतंत्र बंगल्याची सोय नसून रविभवनमधील कॉटेजमध्येच त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर शासन स्तरावर मोठी खळबळ उडाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहतीनुसार शासनाने त्यांच्यासाठी स्वतंत्र बंगला तयार करण्याचे निर्देश दिले.

विधान भवनाच्या दृष्टीने सोयीचे ठरावे व जागा प्रशस्त असावी, अशीही सूचना शासनाकडून बांधकाम विभागाला करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे सिव्हिल लाइन परिसरात शासकीय जागा, बंगला बांधकाम विभागाकडून पाहाण्यात येत असल्याचे सूत्र सांगतात.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT