MLA Bacchu Kadu, Atul Londhe and MLA Ravi Rana Latest News
MLA Bacchu Kadu, Atul Londhe and MLA Ravi Rana Latest News Sarkarnama
विदर्भ

आमदार रवी राणांच्या 'त्या' आरोपांची ED, CBI चौकशी करा, सत्तांतराचे सत्य बाहेर येऊ द्या...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आमदार रवी राणा यांनी राज्याचे माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर पैसे घेऊन गुवाहाटीला गेल्याचे आरोप केले आहेत. हे आरोप अत्यंत गंभीर असून कोण किती खोके घेऊन गुवाहाटीला गेले होते. याची ईडी, सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केली आहे. (MLA Bacchu Kadu, Atul Londhe and MLA Ravi Rana Latest News)

अतुल लोंढे म्हणाले, आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू हे पैसे घेऊन गुवाहाटीला गेले होते, असा आरोप केला आहे. राज्यात सत्तांतराच्या काळात अनेक आमदार ५०-५० कोटी रुपये घेऊन आमदार गुवाहाटीला गेले होते, अशी चर्चा राज्यभरात सुरु होती. त्यावर रवी राणा यांनी शिक्कामोर्तबच केले आहे.

रवी राणा हे आमदार या संवैधानिक पदावर असून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, अशा शब्दात लोंढे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटाच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंह यांच्या एका पत्रावरुन माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्याकडून चौकश्या झाल्या. आता त्याच पद्धतीनं सत्तांतराच्या काळात कोणी कोणाला किती पैसे दिले-घेतले गेले. याचीही ईडी, सिबीआय, इन्कम टॅक्स यांच्यामार्फेत चौकशी झाली पाहिजे. त्यातून राज्यातील सत्तांतराचे सत्य बाहेर येईल व अनेकांचे बुरखे फाटतील.

या संस्थांनी जर या प्रकरणाची चौकशी केली नाही तर त्यांच्या निष्पक्षतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि त्या निष्पक्ष नसून सत्ताधा-यांच्या इशा-यावर फक्त विरोधकांना टार्गेट करत आहेत हे स्पष्ट होईल, अशा शब्दात लोंढेंनी सत्ताधाऱ्यावर टीका केली आहे.

दरम्यान, आमदार राणा आणि आमदार कडू यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार शाब्दिक युद्ध रंगत आहे. आता त्यांच्या या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कडू यांनी ओढले असून त्यांनी राणा यांच्या या आरोपांबाबत स्पष्टीकरणं द्यावे, अशी मागणी केली आहे. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या वादावरून भाजप आणि शिंदे गटाला लक्ष केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT