'राज्याला अजित पवार यांचासारखा मुख्यमंत्री हवा'

महाराष्ट्रावर कुठलीही अडचण आली तरी पैशाचा, राजकारणाचा विचार न करता त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना कसा होईल आणि तो योग्य वेळी कसा होईल. यासाठी अजित पवार यांच्यासारखी एक व्यक्ती असणं महत्वाचं आहे.
Ajit Pawar : Rohit Pawar
Ajit Pawar : Rohit PawarSarkarnama

नगर : अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासारखा मुख्यमंत्री (Chief Minister) राज्याला हवा, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी व्यक्त केली आहे. (Maharashtra needs a Chief Minister like Ajit Pawar : Rohit Pawar)

आताच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कुठेही हे विधान केलेले नाही. दादासारखी व्यक्ती लगेच निर्णय घेऊ शकते. प्रशासनाला विश्वास घेऊ शकते. महाराष्ट्रावर कुठलीही अडचण आली तरी पैशाचा, राजकारणाचा विचार न करता त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना कसा होईल आणि तो योग्य वेळी कसा होईल. यासाठी अजित पवार यांच्यासारखी एक व्यक्ती असणं महत्वाचं आहे, असं रोहित पवार म्हणाले.

Ajit Pawar : Rohit Pawar
निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत नाराजीचा लेटरबॉम्ब : आमदार बनसोडेंना डावलले जात असल्याचा आरोप

आमदार पवार म्हणाले की, नोटेवरील फोटोवरून चालेल्या राजकारणावरही रोहित पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, नोटांवर कुणाचा फोटो असावा, त्याला काय प्रक्रिया आहे, याचा माझा अभ्यास नाही. नोटेवर कोणाचा फोटो लावायचा, याच प्रक्रियेनुसार निर्णय व्हावा. त्या प्रक्रियेत माझं मत मागितलं तर मी जरुर देईन. पण आज तो प्रश्न तितका महत्वाचा नाही. अतिवृष्टीमुळे राज्याच्या ग्रामीण भागात हाहाकार उडाला आहे. यात ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे. शहरी भागात असंघटीत क्षेत्रात अनेक अडचणी आहेत. भविष्यात मंदीमुळे बेरोजगारी वाढण्याची चिन्हे आहेत. नोटापेक्षा लोकांच्या पोटाचं काय, यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.

Ajit Pawar : Rohit Pawar
काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच खर्गेंनी मोदी-शहांच्या गुजरातमध्ये लक्ष घातले : १२५ उमेदवार केले निश्चित

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सरसकट नुकसान भरपाई द्यावी आणि ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी भाजपने केली होती. आता तेच भाजप सत्तेत आहे, त्यामुळे त्यांनी आता लोकांच्या हिताचे निर्णय घ्यावेत. सत्तेत आल्यावर ते जर भूमिका बदल असतील तर लोकांना कळेल की राजकारणासाठी फक्त भूमिका घेत असता, असा टोला रोहित पवार यांनी भाजपला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com