Eknath Shinde, Chandrashekhar Bawankule and Uddhav Thackeray Sarkarnama
विदर्भ

Eknath Shinde News: एकनाथ शिंदे रस्त्यावर सही करणारे मुख्यमंत्री, अन् त्यांच्या तर खिशालाही पेन राहात नव्हता !

Narendra Modi : देशातील १४८ कोटी लोकांना प्रोत्साहित करण्याचं काम ते करतात.

सरकारनामा ब्यूरो

Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : ‘मन की बात’चे शंभर भाग पूर्ण होणे ही बाब आमच्या सर्वांकरिता आणि देशाकरिता अभिमानाची बाब आहे. नरेन्द्र मोदी हे जगातील एकमेव असे नेते आहेत, की देशात आज काय नवीन घडलं, त्याचं रिसर्च टिमच्या माध्यमातून करून देशातील १४८ कोटी लोकांना प्रोत्साहित करण्याचं काम ते करतात, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. (He speaks to the country on the fourth Sunday of the month)

नागपुरात आच (ता. २८) सकाळी आमदार बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. जगातील एकमेव असा नेता आहे की महिन्याच्या चौथ्या रविवारी देशाशी बोलतो आहे. त्याचे यश आम्हाला महाराष्ट्रातही दिसते आहे. महाराष्ट्रात ५० हजार ठिकाणी आमच्या बूथ प्रमुखापासून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आजचा कार्यक्रम यशस्वी केला.

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, आता निवडणुकीत मतदानातूनच त्यांना उत्तर द्यावे लागेल. शेवटी अति तिथं माती, ही म्हण त्यांनी लक्षात ठेवावी. या वातावरणात स्फोट होऊ नये म्हणून आम्ही कार्यकर्त्यांना शांत ठेवतो आहे. सार्वजनिक स्वरूपात पक्षाची तुम्ही भूमिका मांडा, विकासाची भूमिका मांडा, पण वैयक्तिक टीका करू नका, असा सल्ला त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना दिला.

त्यांच्याकडून करण्यात येत असलेल्या टीकांमुळे कार्यकर्ता चिडतो आणि एक दिवस त्याचा स्फोट होतो. डिवचल्यावर भाजपचे कार्यकर्ते काहीतरी वेडेवाकडे करतील आणि त्यांना सहानुभूती मिळवता येईल, असा त्यांचा डाव आहे. सहानुभूतीने सर्व काही मिळेल, असे त्यांना वाटत आहे. उद्धव ठाकरे हे सध्या सहानुभूतीच्या भरवशावर जीवन जगत आहे, असा आरोप बावनकुळे यांनी केला.

विरोधी पक्षाला लोकनेता समितीचे अध्यक्ष द्यावच लागते. विरोधी पक्षांकडून जो प्रस्ताव येतो तो अंतिम असतो, त्यामुळे रोहित पवार अध्यक्ष झाले तर त्यात गैर काहीच नाही. आमचे सरकार आणि संघटन एकत्र काम करू आणि १४८ जागा निवडून आणू. जनतेला अपेक्षित असलेले सरकार भाजप-शिवसेना युती नक्कीच आणेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

आमच्यात कुठलंही मतमतांतर नाही. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये चांगला समन्वय आहे. डबल इंजीन सरकार आहे. योग्य पद्धतीने काम करत आहे. एकनाथ शिंदे हे रस्त्यावर सही करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटले आहेत. एवढा चांगला मुख्यमंत्री भेटला आहे. नाहीतर अगोदर खिशाला पेन नसणारा मुख्यमंत्री होता, अशी जळजळीत टीका बावनकुळेंनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली.

बाजार समित्यांमध्ये पक्षीय राजकारण नसते. याला कोणी आपलं गट-तट म्हणवून घेऊ नये. जे निवडून येतात, ते सहकार क्षेत्रात काम करतात. सहकार क्षेत्रात याची आघाडी, त्याची आघाडी, कब्जा असे काहीही नसते. बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये (APMC Election) स्थानिक पातळीवर राजकारण (Politics) करून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये.

‘सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली’, असे म्हणत सत्ता गेली, पन्नास लोक निघून गेले, संघटन जात आहे. मात्र अजूनही सत्तेचा बाणा त्यांचा जात नाही. तुम्ही जाहीर केले होते, पत्र दिले होते. आता पाठपुरावा करून जनतेत गेले पाहिजे. पण कुठे काही चांगले काम होत असेल, तर त्याला विरोध करता कामा नये, असे आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) बारसू प्रकल्पाच्या बाबतीत बोलताना म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT