Nagpur News : देशात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी प्रचार शिगेला पोहाेचला आहे. राजकीय पक्षांची एकच लगबग सुरू आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या टीका-टिप्पणी अन् आरोप प्रत्यारोपाला चांगलीच धार चढली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे. (Latest Marathi News)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीच्या प्रचारासाठी विदर्भात तळ ठोकून आहेत. आज नागपूर येथे एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, "राहुल गांधी भारतात असतातच कुठे? ते नेहमी विदेशात जातात, थोडा उकाडा वाढला, गरम झालं तर ते विदेशात जाऊन बसतात. विदेशात आपल्याच देशाची बदनामी करतात. दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी एक दिवसही सुट्टी घेतली नाही. हाच या दोन नेत्यांमध्ये फरक आहे. राहुल गांधींना (Rahul gandhi) फक्त बदनामी करता येते. थोडं गरम झालं की लंडनला निघून जातात. युरोपला निघून जातात, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली."
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"80 करोड जनतेला मोफत राशन देणारा कोण मोदींजीशिवाय कोण निर्माण झाला आहे. काँग्रेस म्हणत होती गरिबी हटाव, पण गरिबी काय हटली नाही, गरीब मात्र हटला. मोदींनी तीन कोटी महिलांना घर, लखपती दीदी, शेतकरी, युवा, महिलांसाठी मोदींच्या योजना आहेत," असे मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.