Eknath Shinde Operation Tiger 3.0; Uddhav Thackeray sarkarnama
विदर्भ

Uddhav Thackeray : ऑपरेशन टायगर 3.0 : ठाकरेंच्या आमदाराची पोस्ट व्हायरल, विदर्भातील तीन आमदार शिंदेच्या गळाला?

Uddhav Thackeray Setback Eknath Shinde Operation Tiger 3.0 : राज्यात पु्न्हा एकदा ऑपरेशन टायगर 3.0 होणार असून ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Aslam Shanedivan

Vidarbha News : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला असून यामुळे मोठा राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. धक्क्यातून अद्याप ठाकरे सावरले नसून त्यांनी या बंडखोर खासदारांच्या मतदारसघांचा दौरा सुरू केला आहे. एकीकडे पक्षाची बांधणी ठाकरे आणि त्यांचे नेते करत असतानाच आता 'ऑपरेशन टायगर-3' ची चर्चा सुरू झाली आहे. या ऑपरेशन टायगर-3 मधून ठाकरेंच्या शिवसेनेतील 14 आमदार फोडण्याची प्लॅन एकनाथ शिंदे यांच्याकडून आखला जात आहे.

अशातच विदर्भातील ठाकरेंच्या आमदाराची फेसबूक पोस्ट व्हायरल झाली असून तीन आमदार शिंदेच्या गळाला लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंना मोठा धक्का बसेल अशी कुजबूज राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. तर आमदार सिद्धार्थ खरात यांची ही पोस्ट असून जी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून विदर्भात पक्षबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे.

न्यूज 18 मराठीवर आलेल्या वृत्तानुसार 6 खासदारांच्या फुटीच्या धक्क्यातून अद्याप ठाकरे सावले नसतानाच शिंदेंकडून ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याच्या तयारी केली जात आहे. 'ऑपरेशन टायगर-2' च्या यशानंतर शिंदेंकडून 'ऑपरेशन टायगर-3' तयारी केली जात असून ठाकरेंचे 14 आमदार फुडण्याची रणनीती आखली जात आहे. तशी चर्चाही आता सुरू झाली असून नुकताच 4 एक आमदारांनी शिंदेंची भेट घऊन आपल्याला 12 आमदारांचा पाठिंबा असल्याचे कळवले आहे. तर आता लगेच 'ऑपरेशन टायगर-3' न करता काही वेळ थांबण्याची विनंती या आमदारांनी केल्याचे वृत्त आहे.

अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांची फेसबूक पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. त्यांच्या या 'पोस्ट'मुळे उडाली खळबळ असून या पोस्टचा चुकीचा अर्थ लावला जात असून ठाकरेंचे तीन आमदार शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा पसरवली जात आहे. तसेच खरात यांच्या पक्षबदलाच्या अफवांना देखील उधाण आले आहे.

यावर आता खरात यांनी स्पष्टीकरण दिले असून या सर्व चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या. वेळी आमदार खरात म्हणाले की, कितीही संकटे आली, तरी मी उद्धव ठाकरेंना आणि शिवसेना पक्षाला सोडून कुठेही जाणार नाही. मी माझ्या मतदारांचा आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात करणार नाही, असे खरात यांनी आपल्या पक्षांतराच्या चर्चांना पूर्णपणे पूर्णविराम दिला आहे.

तसेच खरात यांनी आपल्या फेसबुक पोस्टचा चुकीचा अर्थ लावला जात असून मतदारांच्या विश्वासाशी प्रतारणा करणार नाही असे म्हटले आहे. त केवळ अडीच महिन्यांच्या अल्प कालावधीत फक्त उद्धव ठाकरे यांच्यावर असलेल्या अथांग विश्वासामुळेच मतदारसंघातील जनतेने आणि मतदारांनी मला निवडून दिले आहे. यामुळे विश्वास दाखवणाऱ्या मायबाप जनता आणि नेतृत्वाशी प्रतारणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आमदार सिद्धार्थ खरात यांच्या या स्पष्टीकरणानंतर आता बुलढाण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेत नवा उत्साह संचारला असून खरात यांच्याबाबत सुरू असणाऱ्या चर्चा आणि तर्कवितर्कांना आता पूर्णपणे पूर्णविराम लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT