Nagpur News: नागपूर जिल्ह्यातील शिंदे सेनेच्या एकाही नेत्याचे एकमेकांसोबत पटत नाही. ते एकमेकांच्या दारात उभे राहात नाही. त्यामुळे नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा प्रमुख कोण? कोणाच्या नेतृत्वात निवडणूक लढायची, कोण तिकीट वाटप करणार, महायुतीची बोलणी कोण करणार असे अनेक प्रश्न शिवसैनिकांना पडले होते. ही अडचण पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सोडवले आहे. जिल्ह्यातील तीन नेत्यांना विधानसभा मतदारसंघ वाटून दिले आहेत. या मतदारसंघा अंतर्गत येणाऱ्या स्थानिक निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर निश्चित केली आहे.
सावनेर, हिंगणा, उमरेड, कामठी या चार विधानसभा क्षेत्रातील 7 नगरपरिषदा व 9 नगरपंचायत निवडणुकीची जबाबदारी शिवसेनेचे उपनेते आमदार कृपाल तुमाने यांच्यावर सोपवण्यात आली आहे. रामटेक विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीची जबाबदारी अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि काटोल विधानसभा तसेच कळमेश्वर तालुका आणि खापा नगर परिषदेची जबाबदारी पूर्व विदर्भाचे संघटक किरण पांडव यांच्यावर सोपविली आहे.
शिवसेनेचे (Shivsena) उपनेते कृपाल तुमाने हे दोन वेळ रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. या माध्यमातून त्यांचा संपूर्ण जिल्ह्याशी संबंध आहे. 10 वर्षांच्या कार्यकाळात नागपूर ग्रामीणमधील प्रत्येक गावागावात पोहोचले आहेत. गावागावात त्यांचा संपर्क आहे. सध्या ते विधान परिषदेचे सदस्य आहे. आशिष जयस्वाल रामटेक विधानसभा मतदारसंघातून चारवेळा निवडून आले आहेत.
जिल्हा परिषदेच्या राजकारणातूनच ते पुढे आले आहेत. अर्थराज्यमंत्री असल्याने त्यांचे राजकीय वजन वाढले आहे. याशिवाय भाजपच्या नेत्यांसोबतही त्यांची उत्तम मैत्री आहे. किरण पांडव पूर्व विदर्भाचे संघटक आहेत. त्यांचे काम भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्हा प्रामुख्याने असले तरी ते नागपूरचे आहेत.
काटोल आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढले आहेत. किरण पांडव यांच्याकडे सोपवलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी मंत्री व काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचे वर्चस्व आहे.
काटोल अनिल देशमुखांचा बालेकिल्ला आहे तसेच येथे सध्या भाजपचे चरणसिंग ठाकूर आमदार आहेत. कळमेश्वर आणि खापा नगर परिषद या सुनील केदारांच्या सावनेर मतदारसंघात येतात. हे बघता पांडव यांना कठीण पेपर मिळाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.