Dharashiv DCC bank : भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीत प्रवेश करूनही दणका: धाराशिव जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्तीचे आदेश

Dharashiv District Bank Board Dismissal News : धाराशिव जिल्हा बँकेत कार्यरत असलेले संचालक मंडळ जिल्हा बँकेच्या ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्यासाठी सहकार आयुक्ताना निर्देश देण्यासाठी मान्यता दिली आहे.
Osmanabad District Bank News
Osmanabad District Bank NewsSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : नाशिक, नागपूर व धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेला 827 कोटी रुपयांचे भागभांडवल देण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. नाशिक, नागपूर जिल्हा बँकेच्या आर्थिक कमकुवतीमुळे या बँकांवर सध्या प्रशासक कार्यरत आहे तर धाराशिव जिल्हा बँकेत कार्यरत असलेले संचालक मंडळ जिल्हा बँकेच्या ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्यासाठी सहकार आयुक्ताना निर्देश देण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे धाराशिव जिल्हयातील या संचालक मंडळींना महायुतीमध्ये प्रवेश करूनही दणका बसला आहे.

धाराशिव जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, उपाध्यक्ष मधुकर मोटे, संचालक सुनील चव्हाण, बळवंत तांबारे, नागाप्पा पाटील, विक्रम सावंत, सुरेश बिराजदार, संजय देशमुख, महेबूब पाशा पटेल, संजय कांबळे, संजू पाटील, अपेक्षा आष्टे, प्रविणा कोळपे असे संचालक मंडळ सध्या अस्तित्त्वात होते.

अडीच वर्षांपूर्वी झालेल्या राज्यातील सत्तातरानंतर अनेक संचालक मंडळींनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर काही जणांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, त्यानंतरही संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Osmanabad District Bank News
Shivsena UBT crisis : ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! कोकणात एकाचवेळी मुंबई संपर्कप्रमुख आणि शहरप्रमुखाने सोडली साथ

धाराशिव जिल्हा बँकेच्या ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे हे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महायुतीमधील नेत्यांना धक्का बसला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने नाशिक, नागपूर व धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पुनर्रभांडवलीकरण व पुनर्जीवन करण्याबाबत सरकारला कळविले आहे. त्यानुसार या तीन बँकांना भागभांडवल म्हणून अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे.

Osmanabad District Bank News
NCP News: चंदगड पाठोपाठ आता सांगलीतही राष्ट्रवादी एकत्र; मानसिंगराव नाईकांच्या निर्णयाचा विरोधकांना धसका

शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भूमिका महत्त्वाची असते. जिल्हा बँकेच्या आर्थिक स्थितीवरच सेवाविकास बँकेचे अस्तित्व असते. त्यामुळेच नाशिक, नागपूर व धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेला 827 कोटी रुपयांचे भागभांडवल स्वरूपात शासकीय अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये नाशिक बँकेला 672 कोटी तर नागपूर जिल्हा बँकेला 81 कोटी तर धाराशिव जिल्हा बँकेला 74 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

Osmanabad District Bank News
BJP Maharashtra : बिहारची मोहीम फत्ते होताच विनोद तावडेंचं महाराष्ट्रात कमबॅक : विखे पाटील, शिवेंद्रराजेंनाही भाजपमध्ये 5 वर्षातच मानाचे पान

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com