Eknath Dawale, Buldana
Eknath Dawale, Buldana Sarkarnama
विदर्भ

मातृतीर्थ बुलडाण्याचे भूमिपुत्र एकनाथराव डवले बनले राज्याचे प्रधान सचिव

गजानन काळुसे

बुलडाणा : मातृतीर्थ बुलडाणा (Buldana) जिल्ह्याचे रहिवासी असलेले, भूमिपुत्र एकनाथ राजाराम डवले (Eknath Rajaram Dawale) यांना महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) नुकतीच पदोन्नती देत प्रधान सचिव पदी नियुक्त केले आहे,. या नियुक्तीने डवले यांनी पुन्हा एकदा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मूळ बुलडाणा तालुक्यातील माळवंडी या छोट्याशा गावाचे ते रहिवासी आहेत.

एकनाथ डवले प्रशासकीय सेवेत (Administration Service) आपली वेगळी छाप सोडणारे व विविध पदांवरून जनसामान्यांच्या कल्याणासाठी रात्रंदिवस झटणारे अधिकारी म्हणून एकनाथ डवले यांची महाराष्ट्रभर ओळख आहे. अत्यंत साधी राहणी व उच्च विचारसरणी, यानुसार ते कार्य करतात. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या धाड या गावातील शाळेत झाले. सन १९९७ सालच्या भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले एकनाथराव सध्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याचे सचिव आहेत. कृषी ग्रामविकास व महसूल सुधारणा हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी सुरुवातीला महसूल विभागात उपविभागीय अधिकारी पदावर प्रभावीपणे काम केले.

उत्पादन अभियंता अभियांत्रिकीमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले डवले यांनी त्यानंतर वाशीमचे सीईओ आणि अकोला व लातूरचे जिल्हाधिकारी म्हणून प्रयोगशील काम केले. पांदण रस्त्यांसाठी त्यांनी केलेले काम लक्षवेधी ठरले. राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यानंतर नाशिक येथे महसूल विभागाचे आयुक्त म्हणून रुजू झाले. या कालावधीत पर्यावरण विषयक कार्यक्रमात सहभागी होताना ते स्वतः दुर्गंधीयुक्त पाण्यात उतरून त्यांनी कचरा व घाण साफ केलेली आहे. त्यावेळी डवले यांच्या पत्नी डॉ जया डवले यासुद्धा त्यांच्या सोबत होत्या.

या कामाची छायाचित्रे वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होताच त्यांचे राज्यभरात कौतुक झाले. सन २०१७ साली एकनाथ डवले यांची जलसंधारण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी या विभागाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. २०१९ पासून ते आजपर्यंत कृषी विभागाच्या सचिवपदी कार्यरत आहेत. यादरम्यान त्यांनी जलयुक्त शिवार कार्यक्रमाला दिशा देण्याचे चांगले काम केले. कृषी विभागात त्यांनी अनेक कौशल्यपूर्ण कामे केलेली आहेत. शेतक-यांना वेळेवर बियाणे व खते मिळण्यासाठी कंपनीवर कठोर कारवाई करण्याची भूमिका त्यांनी घेतली.

उपविभागीय अधिकारी ते प्रधान सचिव यशस्वी प्रवास..

एकनाथ डवले यांनी उपविभागीय अधिकारी पदापासून प्रशासकीय सेवेला सुरुवात केली. शासनाने त्यांना पदोन्नती देऊन प्रधान सचिवपदी नियुक्त केले आहे. त्यांना ग्रामीण भागातील समस्यांची जाण असल्यामुळे मागील काही वर्षापासून कृषी विभागांमध्ये त्यांनी आमूलाग्र बदल घडवला. त्यामध्ये कृषी विभागातील सर्व योजना ऑनलाइन पद्धतीने राबवणे जेणेकरून यामध्ये सर्व शेतकऱ्यांना समान न्यायाप्रमाणे लाभ मिळू शकेल. पीक विमा कंपन्यांचा सातत्याने पाठपुरावा करीत जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्यासाठी विमामध्ये बदल करण्याबाबत पाठपुरावा. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत मंजुरीचे अधिकाराचे विकेंद्रीकरण तालुकास्तरावर करून प्रकल्पास गती देण्याचे काम केले. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना रक्कम मिळण्याकरिता सर्व विभागांशी समन्वय घडवून जास्तीत जास्त शेतकरी यामध्ये पात्र करण्यासाठी प्रयत्न यांनी केलेले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT