Bachchu Kadu, Devendra Fadnavis, Eknath Shinde Sarkarnama
विदर्भ

Bachchu Kadu News : मंत्रिपदावरचा दावा सोडल्यानंतरही बच्चूभाऊ विस्तारावर बोललेच; '' त्यादिवशी मी अमेरिकेत...''

Bachchu Kadu On Cabinet Expansion : '' मी स्वत: मंत्रिपद नाकारलं, त्यामुळे तो विषय संपला, पण...''

सरकारनामा ब्यूरो

Amravati : शिंदे - फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार वर्षभरापासून रखडला आहे. यात अपक्ष आमदार व प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी वारंवार आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा बोलून दाखवली होती. मात्र, अजित पवार भाजपसोबत जात सरकारमध्ये सामील झाले आणि तेव्हापासूनच कडू यांना मंत्रिपद मिळणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली. काही दिवसांतच मुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा केल्यानंतर मोठा निर्णय जाहीर करतानाच आपण मंत्रिपदावरचा दावा सोडत असल्याचं म्हटलं. पण आता मंत्रिमंडळ विस्तारावर आमदार बच्चू कडू यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे.

आमदार बच्चू कडू (Bachuchu Kadu) यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. राजकीय घडामोडींसह मंत्रिमंडळ विस्तारावरही त्यांनी यावेळी भाष्य केले. कडू म्हणाले, माझं काय होईल म्हणून चिंता करु नका. बच्चू कडू हा बच्चू कडू म्हणून काफी आहे. आमदार, मंत्री असो नसो. मला चिंता नाही. मी स्वत: मंत्रिपद नाकारलं, त्यामुळे तो विषय संपला. ज्यादिवशी मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यादिवशी मी अमेरिकेत जाऊन बसणार आहे अशी मिश्किल टिप्पणी कडू यांनी केली आहे.

राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी भाजपचं सरकार आलं तर आम्ही टोलमुक्त करु असं आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनाचं भाजपने काय केलं? असा सवाल केला. यावरही बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. कडू म्हणाले, राज्यातलं सरकार हे भाजपचं सरकार नाही ना, शिंदे सरकार आहे ना, त्यामुळे प्रोब्लेम असू शकतो असे प्रत्युत्तर दिले.

हे पूर्ण भाजपचं सरकार नाहीय. तुम्हाला माहितीय की, कशाप्रकारे सरकार बनलं आहे. त्यामुळे मोठे निर्णय घेताना काही वेळ द्यावा लागेल. मला वाटतं टोल फ्री राज्य अशी त्यांची भूमिका होती. ती केली पाहिजे. नाहीतर निवडणूक आहेच. लोक त्यांना दणका देणारच असेही कडू यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी आज शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधला. डबल इंजिनचं सरकार म्हणत होते. मग तिसरा डालड्याचा डब्बा आहे का? असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. “डब्बा कशाचाही असू द्या, आहे ना काहीतरी, त्या डालड्यामध्येही आम्ही काही चांगलं करु ना. डब्बा जरी डालड्याचा असला तरी त्यामध्ये आम्ही खिचडी पकवू ना. तुम्ही त्याची चिंता करु नका असा टोलाही कडू यांनी लगावला.

ठाकरेंना वाढदिवसानिमित्त सल्ला...

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. मी कडू जरी असलो तरी त्यांना गोड सल्ला देतो. आजच्या दिवशी आपण चांगलं गोड बोलावं. आम्ही सुद्धा तुम्हाला गोड शुभेच्छा देतो. राज्याच्या राजकारणात काय होईल ते काहीच सांगता येत नाही. आपल्याला माहीत आहे कशापद्धतीने राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यामुळे इंडियावाले एनडीत येऊ शकतात किंवा एनडीए इंडियात जाऊ शकतं असं विधानही बच्चू कडू यांनी केलं.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT