Narendra Modi News
Narendra Modi NewsSarkarnama

Narendra Modi News : 'माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील टॉप-तीन अर्थव्यवस्थांपैकी एक असेल'; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

PM Narendra Modi : प्रत्येक भारतीयाला 'भारत मंडपम्' पाहून आनंद आणि अभिमान वाटतो.

Narendra Modi Delhi News : प्रत्येक भारतीयाला 'भारत मंडपम्' पाहून आनंद आणि अभिमान वाटतो. भारत मंडपम् हे भारताच्या संभाव्यतेचे, नवीन उर्जेचे प्रतीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) बुधवारी संध्याकाळी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन 'कम कन्व्हेन्शन सेंटर' संकुलच्या उद्घाटनावेळी बोलत होते.

मोदी म्हणाले, 'भारत मंडपम्' या नावामागे भगवान बसवेश्वर यांच्या अनुभव 'मंडपम्'ची प्रेरणा आहे. हे बांधकाम थांबवण्यासाठी नकारात्मक विचार करणाऱ्यांनी प्रयत्न केले. त्यांनी न्यायालयाच्या चकरा मारल्या. प्रत्येक चांगल्या कामात अडथळे आणण्याची व अडवणूक करण्याची काही लोकांची प्रवृत्ती असते, असा हल्लाबोल मोदींनी विरोधकांवर केला.

Narendra Modi News
BJP News : बारामतीबाबत पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार काम करु; भाजपने स्पष्ट केली भूमिका

आमच्या सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये भारत जागतिक अर्थव्यवस्थेत 10 व्या क्रमांकावर होता. दुस-या टर्ममध्ये भारत जागतिक अर्थव्यवस्थेत पाचव्या क्रमाकांवर आला आहे. मी ट्रॅक रेकॉर्डच्या आधारे सांगत आहे की, आपल्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत जागतिक अर्थव्यवस्थेच्या तिसऱ्या क्रमांकावर असेल, असा दावा त्यांनी केला. माझ्या तिसऱ्या कार्यकाळात जनता त्यांची स्वप्नं त्यांच्या डोळ्यासमोर पूर्ण होताना पाहू शकेल. देशाचा विकासरथ हा अधिक वेगाने धावेल, असेही नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

आज जग स्वीकारत आहे की भारत ही 'लोकशाहीची जननी' आहे. आपण स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी 'अमृत महोत्सव' साजरा करत आहोत, तेव्हा हा 'भारत मंडपम्' ही आम्हा भारतीयांनी आपल्या लोकशाहीला दिलेली एक सुंदर भेट आहे. काही आठवड्यांनंतर येथे 'जी २०' शी संबंधित कार्यक्रम होणार आहेत. जगातील बड्या देशांचे प्रमुख येथे उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण जगाला भारताची वाढलेली उंची या 'भारत मंडपम्'मधून दिसेल.

Narendra Modi News
Chitra Wagh News : 'कोविड घोटाळ्यात कंत्राटे कोणी ओरबाडली; उद्धवजी... यावर कधी बोलाल?' चित्रा वाघांनी डिवचलं

आजचा दिवस प्रत्येक देशवासियांसाठी ऐतिहासिक आहे. आज कारगिल विजय दिवस आहे. देशाच्या शत्रूंना भारत मातेच्या सुपुत्रांनी आपल्या शौर्याने पराभूत केले. संपूर्ण देशाच्या वतीने मी कारगिल युद्धात बलिदान दिलेल्या प्रत्येक वीराला श्रद्धांजली अर्पण करतो, असेही मोदी यावेळी म्हणाले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com