Sanjay Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Sanjay Deshmukh ON Lok Sabha Result: निकालापूर्वीच ठाकरे गटाच्या उमेदवाराला विजयाची शंभर टक्के गॅरंटी

Jagdish Patil

Yavatmal Washim Lok Sabha Constituency Exit Poll : देशभरातली जनतेला आता लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. निकालापूर्वी शनिवारी (ता.1 जून) रोजी लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले आहेत. यामध्ये यवतमाळ-वाशिम (Yavatmal-Washim) लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख हे मतमोजणीत आघाडीवर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अशातच आता संजय देशमुख यांचाच विजय होणार असल्याचे बॅनर पुसद शहरामध्ये झळकले आहेत. पुसद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात देशमुखांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर विजय निश्चित! "अरे कोण म्हणतो येत नाही, आल्याशिवाय राहत नाही," असा मजकूर लिहिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवाय एका बाजूला संजय देशमुख आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा फोटो बॅनवर लावण्यात आला आहे. सध्या या बॅनरची जोरदार चर्चा मतदारसंघात सुरु आहे. संजय देशमुख यांचे समर्थक आणि कार्यकर्ते राजू दुधे मित्र मंडळाकडून हा बॅनर लावण्यात आला आहे. विजयाचे बॅनर झळकल्यानंतर आपणाला विजयाची शंभर टक्के खात्री असल्याचं वक्तव्य संजय देशमुख यांनी केलं आहे.

माध्यमांशी बोलताना देशमुख म्हणाले, "यवतमाळ-वाशिम भागातील शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, तरुणांच्या हाताला काम नाही. यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असतानाही केंद्र सरकारने या जिल्ह्यासाठी काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत.

त्यामुळे यवतमाळ-वाशिम या मतदारसंघातील शेतकर्‍यांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारबाबत तीव्र नाराजी आहे. सरकारने या लोकांच्या कुठल्याही अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत. याचाच फायदा मला होणार आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटकांनी एकत्रितपणे काम केलं. त्यांच्या मेहनतीचा आणि परिश्रमाचे फळ मला या ठिकाणी मिळणार असून माझ्या विजयाची शंभर टक्के खात्री आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT