Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : ठाकरेंना पुन्हा भाजपसोबत जायचंय? महाराष्ट्राचं राजकारण हादरवणारं दावा कोणाचा ?

Deepak Kesarkar : शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे महायुतीबरोबर येतील, असे होणार नसल्याचे सांगितले. तसेच उद्धव ठाकरे यांचे फतव्याचे राजकारण लोकसभेला चालले नाही, तसे ते विधानसभेला देखील चालणार नाही, असे म्हटले आहे.
Uddhav Thackeray Deepak Kesarkar
Uddhav Thackeray Deepak Kesarkarsarkarnama

Maharashtra Shiv Sena Politics : शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंच्या राजकीय कारर्कीदविषयी मोठं विधान केलं आहे. "उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फसवणूक केली. यानंतर फतव्यांचे राजकारण केले. त्यामुळे उद्धव ठाकरे भाजपबरोबर येतील, असे वाटत नाही", असे दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निवडणुकीपूर्वी काही लोकांना मध्यस्थी करत नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी निरोप पाठवल्याचा दावा दीपक केसरकर यांनी केला. गयावया करणारे संदेश होते. ज्यांच्या माध्यमातून निरोप जात होते, त्यांच्याकडूनच माहिती मिळाल्याचा दावा केसकर यांनी केला. तरी देखी उद्धव ठाकरे महायुतीचे भाग होतील की माहित नाही. पुढे तसे झाले, तर काय होईल, यावर दीपक केसरकर यांनी तसे काही होणार नाही. तसे शक्य नाही, असे स्पष्ट केले.

"मोदी साहेब हे, मोदी साहेब आहेत. ज्यावेळी त्यांना माफ करायचे होते, त्यांनी केले. एकत्र येण्याची तयारी दाखवली. तरी देखील त्यांना फसवलं. आता फतव्यांचे राजकारण केले. यात उद्धव ठाकरे यांना देखील या फतव्यांचे राजकारण आगामी काळात आपल्याबरोबर राहिल की नाही, याची गॅरंटी नाही. विधानसभेला देखील त्याचा उपयोग होणार नाही", असेही दीपक केसरकर यांनी म्हटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray Deepak Kesarkar
MVA Exit Poll : लोकसभेत पश्चिम महाराष्ट्राचा महाविकास आघाडीला 'हात'; शरद पवारांना साथ?

शिवसेना (Shiv Sena) एकनाथ शिंदे गटाच्या राज्यात 11 उमेदवार निवडून येतील, असा विश्वास केसकर यांनी व्यक्त केला. परंतु काही ठिकाणी उमेदवार उशिराने जाहीर झाल्याने त्याचा फटका आम्हाला बसू शकतो. परंतु विधानसभेला उमेदवारी उशिरा जाहीर होण्याचे प्रकार टाळले पाहिजेत. तसेच निवडणुकीच्या तोंडावर मराठा आणि ओबीसी हा वाद करण्यात आला होता. त्यामागे राजकीाय षडयंत्र होते. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्याकडे दीपक केसरकर यांनी लक्ष वेधले.

फतव्यांचे राजकारण दिसले

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात फतव्यांचा राजकारण बघायला मिळाले. त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रावर झाला नसले, तरी पण मोजक्याच काही भागांवर झाला. या फतव्यांमुळे चार ते सहा जागांवर परिणाम होईल. परंतु या फतव्यांचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसणार नाहीत, असेही दीपक केसरकर यांनी सांगितले.

Uddhav Thackeray Deepak Kesarkar
Minister Chandrakant Patil : मंत्री पाटलांना 'भलताच' कॉन्फिडन्स; सोलापूर, माढ्यात सुप्त लाटेचा करिष्मा दिसणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com