Sanjay Raut, Sanjay Gaikwad  Sarkarnama
विदर्भ

Thackeray Group vs Shinde Gat : EVM वादावरून दोन संजय भिडले; गायकवाडांनी राऊतांची अक्कलच काढली

Sachin Fulpagare

Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपचा दणदणीत विजय झाला. यावरून संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला होता. या आरोपावरून संजय गायकवाड यांनी पलटवार केला आहे.

एकदा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेऊन दाखवा, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले होते. त्यावर संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली. तेलंगणमध्ये निवडणुका कशावर झाल्या? गेल्या वेळी राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार आले होते, त्यावेळी निवडणुका ईव्हीएमवरच झाल्या होत्या ना. त्यावेळी काँग्रेस जिंकली होती. त्या संजय राऊतला अक्कल नाही असे म्हणत आमदार संजय गायकवाड यांनी टोला लगावला.

झारखंडमध्ये तीन वेळा तुमचे सरकार आले. तिथे ईव्हीएमनेच मतदान झाले होते. संजय राऊत यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. मीडिया त्यांना विनाकारण महत्त्व देते. महायुती सरकार पडेल, अशा तारखा देतात. पण काहीच उपयोग नाही. उद्धव ठाकरेंना चुकीचा माणूस मिळालेला आहे. संजय राऊतांमुळे हे वाईट दिवस उद्धव ठाकरेंवर आलेत, अशी टीका आमदार संजय गायकवाड यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय म्हणाले संजय राऊत?

निकाल अनपेक्षित आहेत. चार राज्यांच्या निकालात तीन राज्ये भाजपने जिंकली. तर एका राज्यात काँग्रेसने विजय मिळवला. पण मध्य प्रदेशचे निकाल हे धक्कादायक आहेत. ईव्हीएमवर आम्ही शंकाच घेतली नव्हती. देवेंद्र फडणवीसांनीच विरोधकांवर टीका करताना ईव्हीएमचा विषय काढला. आम्ही ईव्हीएमला दोष देत नाही. ही लोकभावना आहे. पण आमचे एकच म्हणणे आहे, एक निवडणूक मतपत्रिकेद्वारे घेऊन दाखवा. मग तुम्ही ईव्हीएम ईव्हीएम करा, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले होते.

मोदी लाट आहे म्हणता, निवडणूक जिंकलात ना तुम्ही, मग आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका घ्या ना? निवडणुकीतील विजयाने तुमचा आत्मविश्वास वाढला आहे ना. मग तुम्ही मुंबई, ठाणेसह एकूण १४ महापालिकांच्या निवडणुका घ्या लगेच. ईव्हीएमवर घ्या ना, का घाबरताय? चार राज्यांचे निकाल वेगळे आहेत आणि महाराष्ट्राची मानसिकता वेगळी आहे. महाराष्ट्रात कुठलेही मॅजिक चालणार नाही. महाराष्ट्रात वेगळा निकाल लागेल, असे संजय राऊत म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT