Shashikant Shinde and Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis News: फडणवीस म्हणाले, माझ्या घरात वाद होणार नाही, याची गॅरण्टी मी घेऊ शकत नाही !

Shashikant Shinde's Statement: न्यायालय स्थापन करताना वित्त आयोगाच्या योजनेनुसार उच्च न्यायालयाशी चर्चा केली जाते.

सरकारनामा ब्यूरो

Devendra Fadanvis on Shashikant Shinde's Statement : सद्यःस्थितीत संयुक्त कुटुंब पद्धतीला छेद देऊन एकल कुटुंब पद्धती वाढत चालली आहे. त्यामुळे कौटुंबिक कलह वाढत आहेत. परिणामी गुन्हेदेखील घडत आहेत. त्यासाठी कौटुंबिक न्यायालयांची संख्या वाढविण्याबद्दल विलास पोतनीस यांनी सभागृहात प्रश्‍न उपस्थित केला.

या चर्चेत भाई जगताप, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शशीकांत शिंदे सहभागी झाले होते. यावेळी दानवेंनी विचारले की, विधी आयोगाने ५ लाखाच्या संख्येसाठी एक कौटुंबिक न्यायालय असावे, असा निकष ठेवला आहे. याबाबत सरकार काय करते आहे. त्यावर कुठलंही न्यायालय स्थापन करताना वित्त आयोगाच्या योजनेनुसार उच्च न्यायालयाशी चर्चा केली जाते. त्यानंतर प्राथमिकतेप्रमाणे आपण न्यायालये स्थापन करतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ज्या जिल्ह्यात प्रकरणे जास्त आहेत, तेथे आपण तात्काळ न्यायालय स्थापन करतो, असे फडणवीसांनी सांगितले. दरम्यान कौटुंबिक वाद होणारच नाहीत, यासाठी फडणवीसांनी आपल्या कल्पकतेने काही उपाययोजना कराव्या, असे शशीकांत शिंदे म्हणाले.

त्यावर पतिराजांनी चांगले वागावे, अशी टिपणी सभापती निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी केली. तर घरात वाद होणारच नाहीत, याची गॅरण्टी तुमच्या घरी तुम्ही घेऊ शकत नाही आणि माझ्या घरी मी घेऊ शकत नाही, असे उत्तर फडणवीसांनी शिंदेंना दिले. त्यावर सभागृहात एकच हशा पिकला.

फडणवीस (Devendra Fadanvis) उत्तर देत असताना सभागृहात खेळीमेळीचे वातावरण तयार झाले होते. वाद झाला तरी तो फक्त न्यायालयापर्यंत (Court) पोहोचू नये, येवढाच प्रयत्न आपण करू शकतो, असे फडणवीसांनी म्हटल्यावर पुन्हा हशा पिकला. खरं तर हा कौटुंबिक आणि सामाजिक प्रश्‍न आहे. अनेक देशांनी आता हॅपिनेस मंत्रालय सुरू केले आहे. पुढील काळात आपल्यालाही ते करावे लागतील. याबाबत आपण विचार केला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT