Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

Fadanvis On 'INDIA' : समन्वयकही ठरला नाही, अन् पाच नेत्यांचा पंतप्रधान पदावर दावा; फडणवीसांनी घेतला 'इंडिया'चा समाचार !

Narendra Modi : मोदी यांच्या तोडीचा उमेदवार त्यांच्याकडे नाही.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Political News : इंडिया आघाडीतील पाच पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान पदावर दावा केला आहे. समन्वयकसुद्धा अद्याप ठरायचा आहे. यावरूनसुद्धा मतभेद आहेत. त्यांनी कितीही ठरवले तरी जनतेला ते पटले पाहिजे. मोदी यांच्या तोडीचा उमेदवार त्यांच्याकडे नाही. एखाद्याचे नाव ठरवले तरी जनतेला पटायला हवे, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘इंडिया’ आघाडीवर टिका केली. (They do not have a candidate to replace Modi)

स्वतःची बंद होत चाललेली राजकीय दुकानदारी वाचवण्यासाठी विरोधकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाला विरोध आहे. याकरिता विरोधकांनी ‘इंडिया‘ नावाची आघाडी तयार केली असून त्यांच्या दुसरा कुठलाही अजेंडा नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. काल (ता. ३१ ऑगस्ट) नागपुरात म्हणाले.

'इंडिया' (India) आघाडीत ८८ राजकीय पक्ष जरी सहभागी झाले तरी लोकांच्या मनातून मोदी यांना कोणी काढू शकत नाही, असाही दावा यावेळी फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला. नऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वात देशाने झपाट्याने प्रगती केली. विदेशातही मोदी यांच्या नेतृत्वाचा डंका वाजत आहे. गरीब कल्याणाचा ते अजेंडा राबवत असल्याने प्रत्येकाच्या मनात मोदी यांनी घर केले आहे.

दुसरीकडे विरोधकांचे भ्रष्टाचाराचे दुकान बंद होत चालल्याने त्यांना कुठल्याही परिस्थिती मोदी यांना पराभूत करायचे आहे. त्याकरिता आजवर कधीच एकमेकांची तोंडे बघत नसलेले नेते मांडीला मांडी लावून बसत आहे. त्यांना गरिबी हटवायची नाही तर आपले बंद होणारे राजकीय दुकान वाचवायचे आहे असाही आरोप यावेळी फडणवीस यांनी केला.

आघाडीच्या नावावर सर्वच पक्ष स्वतःचे राजकीय महत्त्व वाढवून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याकरिता बॅनर, पोस्टरबाजी केली जात आहे. ‘इंडिया’च्या कितीही बैठका घेतल्या आणि एकत्रित निवडणूक लढल्या तरी कुठलाही परिणाम देशाच्या राजकारणावर होणार नाही, असाही दावा यावेळी फडणवीस यांनी केला.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT