DCM Devendra Fadanvis News : विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा नंबर वन ; फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिले श्रेय..

Maharashtra Political : मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यातील भक्कम सरकारची यशस्वी घौडदौड सुरु.
CM Eknath Shinde -Devendra Fadanvis News
CM Eknath Shinde -Devendra Fadanvis NewsSarkarnama

Maharashtra Political News : महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने महाराष्ट्रातील उद्योग पळवल्याचा, राज्यातील लोखो रोजगार बुडवल्याचा आरोप केला जातो. (Maharashtra State News) सत्ताधाऱ्यांकडून देखील या आरोपांची चिरफाड केली जाते. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आधी डबल आणि ट्रिपल इंजिन सरकारची यशस्वी घोडदौड सुरू असल्याचा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

CM Eknath Shinde -Devendra Fadanvis News
Ambadas Danve Letter To CM: टोल वसुलीत `झोल`, श्वेतपत्रिका काढा ; दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

राज्यात २०२३ या आर्थिक वर्षाच्या तिमाही अहवालानूसार राज्यात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक आल्याचे फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आकडेवारीसह मांडले आहे. (Eknath Shinde) गेल्या २०२२-२३ या आर्थिक वर्षात १ लाख १८ हजार ४२२ कोटींची विदेशी गुंतवणूक राज्यात आणत महाराष्ट्र नंबर एक क्रमाकांचे राज्य ठरले होते आता.

चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत देखील राज्यात तब्बल ३६ हजार ६३४ कोटींची विदेशी गुतंवणूक आणत राज्य अव्वल स्थानावर असल्याबाबत फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. (Maharashtra) आनंदाची बातमी असे ट्विट करत फडणवीसांनी देशभराती इतर राज्याच्या तुलनेत विदेशी गुतंवणूकीत महाराष्ट्र कसा अग्रेसर आहे, याचा तुलनात्मक अहवालच समोर ठेवला.

त्यामुळे फडणवीस यांच्या नुकत्याच झालेल्या जपान दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना ही जोरदार चपराक असल्याचे बोलले जाते. २०२२-२३ या आर्थिक वर्षांत १ लाख १८ हजार ४२२ कोटींची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आकर्षित करुन पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र २०२३-२४ या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत सुद्धा पहिल्याच क्रमांकावर आहे. डीपीआयआयटीने एप्रिल ते जून २०२३ या कालावधीसाठीच्या जारी केलेल्या आकडेवारीनुसार ३६ हजार ६३४ कोटी रुपये विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे.

दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा महाराष्ट्रात आलेला एफडीआय अधिक आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यातील भक्कम सरकारची यशस्वी घौडदौड सुरु आहे आणि गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे मनापासून अभिनंदन! असे ट्विट करत फडणवीसांनी राज्यातील जनतेला ही आनंदाची बातमी दिली आहे.

Edited By : jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com