Paddy Crop in Vidarbha Sarkarnama
विदर्भ

Paddy Crop : सरकारकडून केवळ बोनसची घोषणा, मात्र प्रत्यक्ष वाटपाचा आदेश केव्हा

अभिजीत घोरमारे

Paddy Crop : यंदाच्या खरीप हंगामातील आधारभूत हमीभाव केंद्रावर धान खरेदीसाठी काही दिवस उरले आहेत. वारंवार तारीख वाढवून पूर्णतः धान खरेदी झालेली नाही. उर्वरित 13 दिवसांत हे उद्दिष्ट गाठायचे आहे. अशातच नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाने धान पिकाला प्रतिहेक्टरी 20 हजार रुपये बोनस देण्याचे जाहीर केले होते. या घोषणेला आता दोन महिन्यांचा अवधी लोटत आहे. दुसरीकडेही धान खरेदीची मुदतही काही दिवसांचीच उरली आहे. मात्र, अद्यापही बोनस वाटपाचा आदेश निघालेला नसल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट अद्यापही कायम आहे.

शेतकऱ्यांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी केंद्र शासनाने मान्य कराव्यात, तसेच शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देण्यात यावा, यासाठी शेतकऱ्यांनी केंद्र पातळीवर आंदोलन सुरू केले आहे. असे असले तरी, त्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. अशातच गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विचार केल्यास यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच धान खरेदीचा तिढा निर्माण झाला आहे. ऑनलाइन-ऑफलाइन पद्धतीचा तिढा अद्यापही कायम असून, त्याचा फटका शेतकऱ्यांना धान विक्री करताना सहन करावा लागला. याला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गोंदिया जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन, तसेच आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने संचालित सुमारे 150 आधारभूत केंद्राच्या माध्यतून शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यात येते. फेब्रुवारी अखेरपर्यंत धान खरेदी करता येणार आहे. दुसरीकडे नागपूर येथे हिवाळी अधिवेशात हमीभावासोबत धान पिकाला प्रतिहेक्टरी 20 हजार रुपये क्विंटल बोनस देण्याची घोषणा शिंदे सरकारने केली आहे. ही घोषणा होऊन आता दोन महिन्यांचा अवधी लोटला आहे. मात्र, अद्यापही बोनस वाटपाचा आदेश निघालेला नाही. परिणामी शेतरक्यांवरील आर्थिक संकट कायम आहे.

एकीकडे असमानी सुल्तानी संकटाने भंडारा जिल्ह्यातील शेतकरी भरडला जात आहे. पीक वेळेवर लावले तरी उत्पन्न कमी होत आहे. बियाणे महाग झाली आहेत. खतांचे दर गगनाला भिडलेले आहेत. धान विकला तरी चुकारे यायला उशीर होत आहे. अशा सर्व संकटाला पार करत जिल्ह्यातील शेतकरी धान उत्पादन घेत आहे. मात्र, शासनाने आवश्यक ती मदत घोषणा करूनही मिळत नसेल तर या घोषणेचे काय करायचे? असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT