सांगली : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था आणखी बिघडू नये यासाठी पुण्यानंतर सांगली (Sanagali) जिल्ह्यातही जमावबंदी (Curfew) लागू करण्यात आली आहे. 15 नोव्हेंबर रात्री पासून 20 नोव्हेंबर पर्यंत पाच व पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येणे, सभा घेणे, तसेच शस्त्र, लाठी, काठी बाळगण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे. अमरावती, नांदेड, मालेगाव येथील हिंसाचाराच्या पार्श्वभुमीवर स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
त्रिपुरा (Tripura) येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने रझा अकादमीने (Raza Academy) 12 नोव्हेंबर रोजी पुकारलेल्या बंद पुकारला होता. मात्र या बंद दरम्यान महाराष्ट्रातील अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद व कारंजा या ठिकाणी जातीय हिंसाचार झाला. सांगली जिल्ह्यामध्ये या घटनेचा फायदा घेवून काही समाज कंटक दोन समाजामध्ये, गटांमध्ये तेढ निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी (Dr. Abhijeert Choudhari) जमावबंदीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, शिवप्रतिष्ठानच्या वतीनेही दंगलीच्या प्रकारांच्या निषेधार्थ आज सांगलीत निदर्शने होणार होती. त्यालाही जिल्हाधिकाऱ्यांनी परवागनी नाकारली. त्याचबरोबर सांगलीतच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थिकलशाच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली असल्याने याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
तर अमरावती, नांदेड, मालेगाव हिंसाचाराच्या पार्श्वभुमीवर पुण्यातही खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पत्रक काढून ही माहिती दिली आहे. ग्रामीण भागात 14 नोव्हेंबरपासून ते 20 नोव्हेंबरपर्यंत 24 तासांसाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.