Navnit Rana
Navnit Rana Sarkarnama
विदर्भ

खासदार नवनीत राणांना जबरदस्तीने थांबवणे पोलिसांना पडले महागात…

सरकारनामा ब्यूरो

अमरावती : १५ नोव्हेंबर २०२० रोजी खासदार नवनीत राणा (Navnit Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यावेळी पोलिसांना (Police) नवनीत राणा यांना पोलिस वाहनात बसवून नेण्यात आले. तेव्हा पोलिसांनी अपशब्द वापरले आणि मुंबईला (Mumbai) जात असताना अपशब्द वापरत जबरदस्तीने थांबविले, असा आरोप खासदार राणा यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिस आयुक्त आणि उपायुक्तांना नोटीस देण्यात येणार आहे.

लोकसभा सचिवालयात ९ मार्च रोजी हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यात २०२० मध्ये प्रचंड पावसामुळे शेतीचं खूप नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रति एकर नुकसान भरपाई आणि वीजबिल ५० टक्के माफ करावे, अशी मागणी त्यांनी केली होती. आमदार रवी राणांनी शेतकऱ्यांना घेऊन १३ नोव्हेंबर २०२०ला अमरावती-नागपूर महामार्गावरील मोझरी येथे तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी तिवसा येथे टायरची जाळपोळ केली. त्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.

या आंदोलनामुळे आमदार रवी राणा यांच्यासह १८ शेतकऱ्यांना तिवसा पोलिसांनी अटक केली होती आणि न्यायालयाने २० नोव्हेंबर २०२० पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यावेळी आमदार रवी राणांची दिवाळी न्यायालयीन कोठडीत गेली. १४ नोव्हेंबर २०२० ला दिवाळीच्या दिवशी खासदार नवनीत राणा यांनी कारागृहाबाहेर महिलांना घेऊन ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर १५ नोव्हेंबर २०२० रोजी हे दोघेही शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन निवेदन देणार होते. पण पोलिसांनी सायंकाळी त्यांना घरूनच ताब्यात घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयात आणले होते.

यावेळी खासदार नवनीत राणा चांगल्याच संतापल्या होत्या आणि त्यांनी तेव्हाच सांगितले होते की, या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना संसदेत बोलावून यांच्यावर निलंबनाची कारवाई करायला लावणार आहे. याची तक्रार खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे १२ जानेवारी २०२१ ला केली. त्या तक्रारीवर इतर चार खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ज्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार आणि खासदार हिना गावीत यांच्या स्वाक्षऱ्यादेखील होत्या. अखेर लोकसभा सचिवालयामधून २४ फेब्रुवारी २०२२ ला उपसचिवांनी ९ मार्च रोजी मुंबई पोलीस आयुक्त, अमरावती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग आणि तत्कालीन अमरावती पोलीस उपआयुक्त शशिकांत सातव यांना उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT