rajkumar badole.jpg sarkarnama
विदर्भ

Bjp News : भाजपचे माजी मंत्री बडोले यांचे ठरलं, हातात घेणार घड्याळ

Political News : गोंदिया जिल्ह्यातील भाजपचे नेते आणि फडणवीस सरकारमध्ये राज्याचे सामाजिक न्याय मंत्री असलेले माजी आमदार राजकुमार बडोले यांनी मतदारसंघाचे राजकीय समीकरण बघून सोयीचा निर्णय घेतला आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : महायुतीमुळे अनेक आजी माजी आमदार, नेत्यांनीच अडचण झाली आहे. सोबतच नेत्यांचा संकोच संपला आणि पक्षनिष्ठा आता दुय्यम झाली आहे. निवडून येण्यास प्राधान्य देण्याचे जवळपास सर्वांचे ठरवले असल्याचे दिसते. गोंदिया जिल्ह्यातील भाजपचे नेते आणि फडणवीस सरकारमध्ये राज्याचे सामाजिक न्याय मंत्री असलेले माजी आमदार राजकुमार बडोले यांनी मतदारसंघाचे राजकीय समीकरण बघून सोयीचा निर्णय घेतला आहे.

त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला आहे. ते गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. (Bjp News)

बडोले गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून या पूर्वी दोनवेळा निवडून आले होते. भाजप-सेना युतीच्या कार्यकाळात ते पाच वर्ष सामाजिक न्यायमंत्री होते. असे असतानाही 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला. राष्ट्रवादी संयुक्त असताना मनोहर चंद्रिकापुरे यांनी त्यांचा अवघ्या ७१५ मतांनी पराभूत केले होते. त्यानंतर अस्तित्वात आलेल्या महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली.

अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत आमदार चंद्रिकापुरेही गेले. त्यामुळे या मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा आहे. महायुतीच्या सिटिंग-गेंटिग फॉर्म्युलामुळे बडोले यांच्यासमोर पेच निर्माण झाला होता. कुठून लढायचे असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यांची ही अडचण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्यावतीने प्रफुल पटेल यांनीच सोडवली.

भाजपचाही यास पाठिंबा होताच. आता बडोले कमळाऐवजी घड्याळ्यावर निवडणूक लढणार असल्याचे जवळपास ठरले आहे. त्यांच्या नावाची फक्त अधिकृत घोषणाच शिल्लक राहिली आहे. अर्जुन मोरगाव हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. विद्यमान आमदार चंद्रिकापुरे यांनी आपल्या मुलासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे तिकीट मागितले आहे.

मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार असल्याने बडोले यांना उमेदवारी मिळणार नाही हे आधीपासूनच ठाऊक होते. वर्षभरापासून ते स्वतःच्या फाऊंडेशनच्या बॅनरवर प्रचार करीत होते. तेव्हापासूनच ते भाजप सोडणार अशी चर्चा होती. त्यांच्याकडे दोन पर्याय उपलब्ध होते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जायचे की शरद पवार यापैकी एक निर्णय त्यांना घ्यायचा होता. गोंदिया जिल्ह्यात भाजप आणि प्रफुल पटेल यांचे वर्चस्व लक्षात घेता त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT