Eknath shinde, devendra fadnavis Sarkarnama
विदर्भ

BJP VS Shivsena : भाजपचा माजी आमदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? आमदारकीसाठी लावली फिल्डिंग

Jagdish Patil

Ramtek News, 25 June : लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता लवकरच महाराष्ट्रातील विधानसभेचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. राज्यात लोकसभेला महायुती आणि महाविकास आघाडीमुळे अनेक मित्रपक्षातील उमेदवारांना पक्ष आदेशाचं पालन करत आपली नाराजी लपवावी लागली होती.

अनेकांना इच्छा असतानाही युती-आघाडी धर्मासाठी आपल्या उमेदवारीचा त्याग करावा लागला होता. विधानसभेला देखील राज्यात तीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे. कारण महायुती आणि आघाडीतील नेते आम्ही विधानसभेला लोकसभेप्रमाणे एकत्रच सामोरे जाणार असल्याचं सांगत आहेत. त्यामुळे अनेक इच्छुकांनी आतापासून उमेदवारी मिळवण्यासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.

अशातच आता युतीत मित्रपक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण रामटेक विधानसभेच्या उमेदवारीसाठी भाजपचे माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीनंतर रेड्डी हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर् राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. त्यामुळे विदर्भात आता युतीतील मित्र पक्षातच बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

रामटेकमचे सध्याचे आमदार हे आशिष नंदकिशोर जैस्वाल हे आहेत. त्यांनी 2019 मध्ये अपक्ष निवडणूक लढवत मल्लिकार्जुन रेड्डी यांचा पराभव केला होता. तर जैस्वाल सध्या एकनाथ शिंदेसेनेचे समर्थक आहेत. असं असतानाही शिंदे गटाकडून या मतदारसंघात इतर उमेदवारांची चाचपणी सुरु आहे.

अशातच भाजपचे माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी शिंदेंची भेट घेतल्यामुळे ते उमेदवारीसाठी शिवसेनेत (Shivsena) जाणार असल्याचं बोललं जात आहे. तर भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता नसल्यामुळे त्यांनी शिवसेनेचा पर्याय निवडला असल्याची माहिती माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता शिंदे युतीतील मित्रपक्षाच्या माजी आमदाराला आश्रय देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT