Akola News : लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. बहुतांश जागेवरील उमेदवार जाहीर झाले आहेत. प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. तर दुसरीकडे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षात डावलले गेलेल्या नेत्यांची नाराजी उफाळून आलेली दिसते. या नाराजीचा पक्षांना फटका बसू शकतो. अशीच नाराजी आता भाजपमध्ये अकोल्या जिल्ह्यात उमटले आहे. भाजपचे माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी थेट भाजपच्याच कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केल्याने आता चर्चांना उधाण आले आहे. (Lok Sabha Election 2024)
अकोल्यात भाजपातील मतभेद ऐन निवणुकीच्या तोंडावर समोर आले आहे. अकोल्यात भाजपचे वरिष्ठ नेते तथा माजी आमदार नारायण गव्हाणकर हे बंडखोरी करणार आहेत, अशी चर्चा आहे. तिकीट वाटपावरुन ते आपल्या पक्षावर नाराज आहेत. जाहीरपणे त्यांनी ही नाराजी बोलवून दाखवली आहे. त्यामुळे आता त्यांनी बंडाचे निशाण फडकवले तर भाजपसाठी ही मोठी डोकेदुखी ठरणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान अकोला लोकसभा (Lok Sabhha) मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनूप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान अकेल्यातून भाजपच्या उमेदवारीसाठी आणखी एक नाव कायम चर्चेत राहिले होते. ते नाव म्हणजे भाजपचे आमदार नारायण गव्हाणकर. अकोल्यातून अनूप धोत्रेंना उमेदवारी जाहीर झाल्याने गव्हाणकर हे भाजपच्या एकूणच कार्यप्रणालीवर नाराज आहे.
दरम्यान भाजपचे माजी आमदार नारायण गव्हाणकर बंडोखोरी करणार असून लवकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, असे संकेत त्यांनी दिले. आज बाकी जिल्ह्याच्या तुलनेत अकोल्याचा विकास घसरलाय. गव्हाणकरांनी भाजपच्या निर्णयावर स्पष्टच बोलून दाखवलं. एकेकाळी बाळापुर विधानसभेत गव्हाणकरांनी अपक्ष उमेदवारी दाखल केला होता, तेव्हा भाजपचा पराभव झाला होता. आता पुन्हा तिच स्थिती निर्माण झाल्यास कुठेतरी भाजपाला (BJP) फटका बसू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.