Sharad Pawar NCP Candidates first list : शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; 'या' पाच उमेदवारांची केली घोषणा!

Loksabaha Election 2024 : जाणून घ्या, कोणत्या मतदारसंघामधून कोणाला मिळाली उमेदवारी?
Sharad Pawar, Man Blowing Turha
Sharad Pawar, Man Blowing TurhaSarkarnama
Published on
Updated on

Jayant patil Press : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी पहिली यादी जाहीर झाली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ही यादी वाचून दाखवली.

यामध्ये वर्धा - अमर काळे, दिंडोरी - भास्कर भगरे, बारामती - सुप्रिया सुळे, शिरूर - डॉ. अमोल कोल्हे, अहमदनगर - नीलेश लंके हे मतदारसंघ आणि उमेदवारांचा समावेश आहे.

तर पक्षाची पुढील यादी आणि उमेदवारांची नावे लवकरच जाहीर केली जातील, असं या वेळी जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar, Man Blowing Turha
Mahayuti Seat Allocation : महायुतीचं जागावाटप 4 ते 5 जागांवर अडलंय; देवेंद्र फडणवीसांची कबुली

लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन 15 दिवस झाल्यानंतर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार(Sharad Pawar) पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी शनिवारी जाहीर झाली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला महाविकास आघाडीत 10 जागा मिळण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीतील तीन घटक पक्षात काही जागेवरून मतभेद आहेत. काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गटाने काही जागांवरील उमेदवारांची घोषणा करीत आघाडी घेतली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने चार दिवसांपूर्वी 17 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादीची घोषणा पत्रकार परिषद घेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उमेदवारांची नावे जाहीर केली.

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला 10 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर 22 जागा शिवसेना ठाकरे गटाला तर 16 जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. पवार गटाकडून अद्याप भिवंडी, माढा, बीड, रावेर, सातारा या ठिकाणचा लोकसभेचा उमेदवार जाहीर झालेला नाही. त्यामुळे या ठिकाणच्या उमेदवारांच्या नावांसाठी आपल्याला दुसऱ्या यादीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Sharad Pawar, Man Blowing Turha
Lok Sabha Election: अजितदादांच्या 9 सर्व्हेत ताईच आघाडीवर? दहावा सर्व्हे करून उमेदवार ठरवणार

शरद पवारांनी या शुक्रवारी माढा लोकसभेच्या तिढ्यावरून भाजपवर निशाणा साधला होता. आम्ही या मतदारसंघातून धनगर समाजातील महादेव जानकर(Mahadev Jankar) या नेत्याला उमेदवारी देण्याचे जाहीर केले होते. पण, काय झालं माहिती नाही. आतापर्यंत पक्ष पळवितात हे माहिती होते, त्यांनी हा उमेदवारच पळवला, अशी मिश्किल टिप्पणी करत खासदार शरद पवार यांनी महायुतीवर टीका केली होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com