Congress, BJP Sarkarnama
विदर्भ

Congress Vs BJP : 'आधी हिरव्या रंगाची अ‍ॅलर्जी, आता लाल रंगाचाही...'; माजी मुख्यमंत्री भाजपवर संतापले

CM Bhupesh Baghel News : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते भूपेश बघेल यांनी लाल रंगापासून तुम्हाला काय त्रास आहे अशी विचारण केली आहे. आधी भाजपला हिरव्या रंगाची अ‍ॅलर्जी होती, आता लाल रंगाचासुद्धा त्रास सुरू झाला असल्याचा टोलाही बघेल यांनी लगावला आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : राहुल गांधी नागपूरमध्ये संविधान सन्मान संमेलनात सहभागी झाल्यापासून लाल रंगावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या संमेलनात लाल रंगाच्या वेस्टनात संविधानाच्या प्रती वाटण्यात आल्या होत्या. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या लाल रंगावरून नक्षल समर्थक असे काँग्रेस (Congress) नेत्याला संबोधले होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली होती.

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते भूपेश बघेल यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी लाल रंगापासून तुम्हाला काय त्रास आहे अशी विचारण केली. आधी भाजपला (BJP) हिरव्या रंगाची अ‍ॅलर्जी होती, आता लाल रंगाचासुद्धा त्रास सुरू झाला असल्याचा संतापही बघेल यांनी व्यक्त केली आहे.

बघेल म्हणाले, लाल रंगाला धार्मिक महत्त्व आहे. नवरात्रात देवीला लाल रंगाचेच वस्र घातले जाते. उगवताना आणि मावळताना सूर्याचा रंगही लालच होतो. भाजप सरकार आल्यापासून राज्यावर 251 कोटींचे कर्ज झाले. यावर कोणी बोलत नाही. राहुल गांधींच्या संमेलनात लाल रंगाच्या नोटपॅडवरुन राजकारण केले जात आहे. ते नोटपॅड भाषणाचे पॉइंटर लिहिण्यासाठी देण्यात आले होते.

राहुल गांधी हे संविधान संमेलनात सहभागी होत आहेत. त्यातील सामाजिक न्यायाच्या बाबी जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. त्याच्यामुळे भाजप घाबरली आहे. संविधान बदलण्याची भाषा ही भाजपच्याच नेत्यांची आहे. त्यामुळे संविधानाच्या रक्षणासाठी सर्व पक्ष आणि संघटना एकत्र आल्या आहेत.

देशात सध्या नावाचा संविधनिक व्यवस्था आहे. प्रत्यक्षात आणीबाणीसारखी स्थिती आहे. जो भाजपच्या विरोधात जो बोलेल, त्यांच्याविरोधात ईडी, सीबीआय लावली जात असल्याचा असल्याचा आरोप बघेल यांनी केला.

नक्षलवाद्यांनी जेवढे नुकसान काँग्रेस पक्षाचे केले, तेवढे कोणाचे केले नाही. छत्तीसगड, मध्य प्रदेशातील अनेक नेत्यांना काँग्रेसने नक्षल्यांच्या हल्ल्यात गमावले आहे. आम्हाला आता नक्षली म्हटलं जात आहे. सध्या देशाचा कारभार बघता सर्व संपत्ती एकाच व्यक्तीच्या हातात दिली जात आहे. ईस्ट इंडिया कंपनी पुन्हा पुनरुज्जीवित केली जात असल्याचा धोकाही बघेल यांनी वर्तविला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT