Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

NCP setback : महापालिकेसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीची आशा फोल, खुर्ची नाट्य भोवले; काँग्रेसचे माजी सत्तापक्षनेते वनवे पराभूत

Nagpur municipal election : नागपूर महापालिकेतील खुर्चीनाट्याचा आता शेवट पराभवात झाला असून याचा राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे.

Rajesh Charpe

  • नागपूर महापालिकेतील काँग्रेसचे माजी सत्तापक्ष नेते तानाजी वनवे निवडणुकीत पराभूत झाले.

  • विरोधी पक्षात असताना सत्तापक्ष नेतेपदासाठी झालेले खुर्चीनाट्य मोठ्या प्रमाणात चर्चेत होते.

  • अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला वनवेंकडून मोठी अपेक्षा होती, मात्र ती पूर्ण झाली नाही.

Nagpur municipal election News : नागपूर महापालिकेतील काँग्रेसचे माजी सत्तापक्षनेते तानाजी वनवे पराभूत झाले आहेत. विरोधी पक्षात असताना महापालिकेत वनवे आणि काँग्रेसचे संजय महाकाळाकर यांच्यात सत्तापक्ष नेतेपदावरून झालेले खुर्चीनाट्य चांगलेच गाजले होते. त्यावेळी वनवे यांनी खुर्ची पटकावली होती. मात्र निवडणुकीते त्यांना आपली खुर्ची वाचवता आली नाही. त्यांच्याकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी आशा होती.

काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी संजय महाकाळकर यांची गटनेतेपदी नियुक्ती केली होती. मात्र काँग्रेसमधील दुसऱ्या गटाने तानाजी वनवे यांच्या सत्तापक्षनेत्याच्या खुर्चीवर बसवले होते. यावरून मोठा राडा झाला होता. एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.

या खुर्ची नाट्यात शेवटी वनवे यांनी बाजी मारली होती. या निवडणुकीत ठाकरे हे सुद्धा पराभूत झाले होते. त्यानंतर नामनिर्देशित नगरसेवक होऊ देण्यापासून रोखण्यासाठी वनवे यांना समोर करून ठाकरे यांच्या विरोधकांनी मोठी खेळी खेळली होती. त्यावेळी काँग्रेसचे फक्त २९ नगरसेवक निवडून आले होते.

यापैकी अधिक नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन विभागीय आयुक्तालयात नोंदणी करण्यात आली होती. त्यामुळे महाकाळकर यांना सत्तापक्षनेते पदाची खुर्ची सोडावी लागली होती. त्यानंतर सुमारे साडेचार वर्ष वनवे हे या खुर्चीवर विराजमान होते. विकास ठाकरे पुन्हा तिकीट देणार नाही हे बघून त्यांनी वर्षभरापूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

अलीकडेच त्यांची प्रदेश महासचिव म्हणून पदोन्नती केली होती. भाजपसोबत युती होईल अशी आशा वनवे यांना होती. मात्र त्यांचा अंदाज फसला. येथे वनवे यांचा घात झाला. प्रभाग क्रमांक २७ मधून त्यांच्या विरोधात काँग्रेसने प्रशांत धवड यांना उतरवले होते. दोघांच्या भांडणात भाजपचे प्रवीण गिऱ्हे निवडून आले आहेत.

FAQs :

1. तानाजी वनवे कोण आहेत?
ते नागपूर महापालिकेतील काँग्रेसचे माजी सत्तापक्ष नेते होते.

2. वनवे यांचा पराभव कशामुळे चर्चेत आहे?
सत्तापक्ष नेतेपदासाठी झालेल्या खुर्चीनाट्यानंतर त्यांचा निवडणुकीत पराभव झाला.

3. खुर्चीनाट्य म्हणजे काय?
सत्तापक्ष नेतेपदासाठी वनवे आणि संजय महाकाळाकर यांच्यात झालेला वाद.

4. या पराभवाचा राष्ट्रवादी काँग्रेसवर काय परिणाम झाला?
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला यामुळे मोठा धक्का बसला आहे.

5. नागपूर महापालिका निवडणुकीत हा निकाल का महत्त्वाचा आहे?
कारण यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक राजकारणावर परिणाम होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT