Municipal Election Result : भाजपचा महाविजय! सात शहरांत पहिल्यांदाच 'कमळ' फुलले, विरोधकांचा सुपडा साफ!

Political News : मुंबई, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, इचलकरंजी, कोल्हापूर, कल्याण-डोंबवली या पाच ठिकाणी भाजपचा पहिल्यांदाच 'कमळ' फुलले आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
BJP Ravindra Chavan
BJP Ravindra Chavan Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील महापालिका निवडणुकीची मतमोजणी पार पडली. त्यामध्ये २९ पैकी २२ ठिकाणी महायुतीने बहुमताकडे वाटचाल सुरु ठेवली आहे. त्यातच जवळपास २१ ठिकाणी भाजपचा महापौर निवडून येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यापैकी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, इचलकरंजी, कोल्हापूर, कल्याण डोंबिवली या पाच ठिकाणी भाजपचा पहिल्यांदाच 'कमळ' फुलले आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील 29 महापालिकेची मतमोजणी होत आहे. त्यात भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. मुंबई, ठाणे याठिकाणी भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती केली होती. त्याठिकाणी एकहाती वर्चस्व मिळवले आहे. मात्र, इतर महापालिकेत भाजपने स्वबळावर निवडणूक लढवत मोठे यश प्राप्त केले आहे.

BJP Ravindra Chavan
BJP setback : भाजपला मोठा राजकीय धक्का! अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांचा अनपेक्षित पराभव

भाजपने मुंबई महापालिकेत गेल्या 25 वर्षांपासून असलेली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता उलथवून टाकत प्रथमच बहुमत मिळवले. या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मदतीने भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर होणार आहे.

BJP Ravindra Chavan
BJP Vs Shivsena : एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला घरात घुसून मारहाण : भाजप उमेदवाराचा मुलगा अन् मित्रांवर अॅट्रॉसिटी दाखल

मुंबई महापालिकेत भाजपने ठाकरे बंधूंना पराभव करत विजय मिळवला आहे. या विजयामुळे मुंबईमध्ये भाजप प्रथम आपला महापौर बनवणार आहे. येथे भाजपला तब्बल 90 पेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. तर, शिदेंच्या शिवसेनेला 28 जागा मिळालेल्या आहेत. तर, ठाकरे बंधूंच्या युतीला 66 मिळत असून काँग्रेस 15 जागांवर आहे. तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपने 42 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच भाजपचा महापौर होणार आहे.

BJP Ravindra Chavan
Latur NCP : नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजय खेचून आणला, पण नियतीनं तो आनंद काही दिवसांतच हिरावला

त्यासोबतच मराठवाड्यातील तीन ठिकाणी भाजप पहिल्यांदाच सत्तेत आला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना व नांदेड महापालिकेत देखील भाजपने स्वबळावर बहुमत मिळवले आहे. त्यामुळे याठिकाणी पहिल्यांदाच कमळ फुलले आहे. जालना महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच झाली. त्याठिकाणी रावसाहेब दानवे व माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या मदतीने मोठे यश मिळवले तर नांदेड महापालिकेत अशोक चव्हाण यांनी दमदार कामगिरी करीत काँग्रेसकडून सत्ता खेचून आणत कमळ फुलवले आहे.

BJP Ravindra Chavan
Congress Political News : एक-दोन नव्हे सगळेच आमदार फुटणार, काँग्रेसला धक्का? सत्ताधाऱ्यांनी लावली फिल्डींग? 'या' राज्यात लवकरच मोठा धमाका...

कोल्हापूर महापालिकेत महायुतीची सत्ता येणार असून भाजप नगरसेवकांची संख्या जास्त असल्याने प्रथमच महापौर होंण्याची शक्यता आहे. नव्याने निर्मिती झालेल्या इचलकरंजी महापालिकेतही पहिल्यांदाच भाजपने सत्ता मिळवली आहे. त्यामुळे प्रथमच या ठिकाणी भाजपचा उमेदवार होणार आहे.

BJP Ravindra Chavan
Congress Historic Victory : भाजपचे महापालिकेत बहुमताचे स्वप्न भंगले? अपक्ष नगसेवकांच्या पाठिंब्यासाठी धावाधाव

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com