Sunil Kedar Sarkarnama
विदर्भ

Sunil Kedar मोठी बातमी : काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांना एक वर्षाची शिक्षा

महापारेषणला येथे काम सुरू करण्याची परवानगी दिली कुणी, हा प्रश्न विचारून त्यांच्यासह इतर चौघांनी थुबाळकर व कंत्राटदाराच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करून अचानक मारहाण सुरू केली.

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : कोराडी ते तिडंगीदरम्यान अतिउच्च दाबवाहिनीचे काम करणाऱ्या महापारेषणच्या साहायक अभियंत्याला मारहाण केल्याप्रकारणी सावनेरचे काँग्रेसचे (Congress) आमदार व माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांना नागपूर (Nagpur) जिल्हा न्यायालयाने (Court) एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. (Former Congress Minister Sunil Kedar sentenced to one year)

महापारेषणच्या वतीने कोराडी-तिडंगीदरम्यान ६ ऑक्टोबर २०१६ रोजी अति उच्चदाब वीजवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीही अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. वीजवाहिनीसाठी येथे मोठमोठे मनोरे उभारण्यात आले होते.

महापारेषणचे सहाय्यक अभियंता अमोल खुबाळकर हे ६ ऑक्टोबर २०१६ रोजी दोन-तीन अधिकाऱ्यांसह तेलगाव येथे शेतकऱ्यांशी त्यांच्या पिकहानीच्या भरपाईसंबंधी वाटाघाटी करण्यासाठी गेले होते. सोबत येथील कंत्राटदार मेसर्स बजाज कंपनीचा एक अधिकारीही होता. अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच आमदार सुनील केदार त्यांच्या सुमारे २० सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले.

महापारेषणला येथे काम सुरू करण्याची परवानगी दिली कुणी, हा प्रश्न विचारून त्यांच्यासह इतर चौघांनी थुबाळकर व कंत्राटदाराच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करून अचानक मारहाण सुरू केली. पुन्हा या भागात काम करताना दिसल्यास तुमचे तुकडे करून घरी पाठवू, अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप सुनील केदार यांच्यावर होता.

या प्रकरणात सावनेर पोलिसांनी सुनील केदार यांच्यासह कार्यकर्त्यांवर कलम ३५३ अन्वये गुन्हे दाखल केले होते. सर्व साक्षीदार व पुरावे तपासत न्यायालयाने माजी मंत्री सुनील केदार यांना एक वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. अजय माहुरकर यांनी बाजू मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT