Congress News : काँग्रेसच्या आणखी एका बड्या तरुण नेत्यावर भाजपचा डोळा : खासदाराने थेट दिले पक्षप्रवेशाचे निमंत्रण

विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने नाशिकसारखा काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपने कधी उद्‌ध्वस्त केला, हे काँग्रेस नेत्यांनाही उमगले नाही.
MP Sanjay Patil -Amit Deshmukh
MP Sanjay Patil -Amit DeshmukhSarkarnama

सांगली : विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने नाशिकसारखा काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला भाजपने (BJP) कधी उद्‌ध्वस्त केला, हे काँग्रेस नेत्यांनाही उमगले नाही. नगरमधील युवा नेत्यावर भाजपने फासे टाकून काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम केला. दुसरीकडे, आणखी एका तरुण नेत्यावर भाजपचा डोळा असून सांगलीचे खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांनी लातूरचे अमित देशमुख (Amit Deshmukh) यांना थेट भाजप प्रवेशाचे आवताण (निमंत्रण) दिले आहे. भाजपचा खासदार म्हणून ‘भाजपप्रवेशाचे मी तुम्हाला निमंत्रण देणे गरजेचे आहे, असे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले. (MP Sanjay Patil invited Amit Deshmukh to join BJP)

माजी मंत्री अमित देशमुख हे एका कार्यक्रमानिमित्त सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. त्या कार्यक्रमात एकत्र आलेले खासदार संजयकाका पाटील यांनी देशमुख यांना थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांच्यानंतर भाजपचा लातूरच्या गढीवरही डोळा असल्याचे उघड झाले आहे. देशमुख कोणता निर्णय घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

MP Sanjay Patil -Amit Deshmukh
Pune Crime News : अजितदादांनी हिवाळी अधिवेशनात मांडलेल्या प्रस्तावाची दखल ; १३ जणांवर कारवाई

संजय पाटील म्हणाले की, काल तुमची बातमी बघायला मिळाली. संभाजी पाटील निलंगेकर यांनी काही वक्तव्ये केली आहेत. लातूरचे आमचे प्रिन्स अमितभैया देशमुख भारतीय जनता पक्षात येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केल्याची बातमी आम्ही दूरचित्रवाणीवर पाहिली. आता मी भाजपचा खासदार आहे. कार्यक्रम हा जयदेव बर्वे यांनी घेतला आहे. ज्यांच्याकडे ज्या वाड्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा भरते. त्यांच्या नसानसांमध्ये संघाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे काम आहे. तेव्हा अशा कार्यक्रमाला अमितभैया तुम्ही आला आहात आणि मी तुम्हाला त्याबाबत (भाजपप्रवेशाबाबत) आग्रह न करणे यथोचित होणार नाही.

MP Sanjay Patil -Amit Deshmukh
Congress news; डॉ. सुधीर तांबे यांनी तीन महिने काय केले?

तुमच्यासाख्या कर्तृत्वसंपन्न, तरुण सहकाऱ्यांनी, ज्यांचं नाव महाराष्ट्रातील कानापोऱ्यात मुख्यमंत्री म्हणून प्रभावी छब्बी त्यांची आहे. मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं, अशा देशमुख साहेबांच्या पोटी तुम्ही जन्म घेतला आहे. अमित देशमुख सांगलीत आल्यानंतर त्यांनी भाजपत प्रवेश करावा, यासाठी मी भारतीय जनता पार्टीचा खासदार म्हणून आग्रह करणे गरजेचे आहे; मी म्हणून अमित देशमुख यांना आग्रह करतो, असे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.

MP Sanjay Patil -Amit Deshmukh
Nashik News: नाशिक पदवीधर मतदारसंघ; तांबे पिता-पुत्रांवर काँग्रेस आता काय कारवाई करणार ?

खासदार पाटील म्हणाले की, आणखी एका गोष्टीचं कौतुक मला निश्चित आहे. ज्यावेळी वसंतदादा पाटील या राज्याचे मुख्यमंत्री होते, तेव्हा विलासराव देशमुख या गृहराज्यमंत्री होते आणि दुसरे गृहराज्यमंत्री शिराळ्याचे शिवाजीराव देशमुख होते. त्याकाळी दोन गृहराज्यमंत्री हेाते. विलासराव देशमुख यांच्याकडे सांगलीचे पालकमंत्रीपद होते. मराठवाड्यातील एक नवखा, तरुण नेता ‘वसंतदादांनी माझ्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली. सांगलीचा पालकमंत्री असताना खूप शिकायला मिळालं. त्यामुळे साखर कारखाने, बॅंका, शैक्षणिक संस्था यांच्या माध्यमातून विकास गतीमान करण्यासाठी सुरवातीच्या काळात मला जे धडे मिळाले, ते सांगलीत पालकमंत्री म्हणून काम करताना मिळाले, असे विलासराव देशमुख अनेकदा आपल्या भाषणातून सांगायचे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com