Ashish Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Ashish Deshmukh News : माजी आमदार आशिष देशमुखांचे ‘स्टार' फिरले

Political News : आशिष देशमुख काटोलचे आमदार होते. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्यांनी पराभवाचा धक्का दिला होता. भाजप, काँग्रेस आणि पुन्हा भाजप असा प्रवास त्यांनी आतापर्यंत केला आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आशिष देशमुख यांना भाजपने होल्डवर ठेवले आहे. पहिल्या यादीत त्यांचे नाव आले नाही. त्यांचा पत्ता कट केल्याची चर्चा आहे. आता स्टार प्रचारकांच्या यादीतही त्यांचे नाव झळकलेले नाही. हे बघता यावेळी देशमुखांचे स्टार फिरले असल्याचे दिसून येते.

आशिष देशमुख काटोलचे आमदार होते. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्यांनी पराभवाचा धक्का दिला होता. भाजप, काँग्रेस आणि पुन्हा भाजप असा प्रवास त्यांनी आतापर्यंत केला आहे. यावेळी त्यांना पुन्हा काटोलमधून लढायचे आहे. तशी तयारीही त्यांनी सुरू केली होती. मात्र, त्यांच्या निष्ठेवरच भाजपला शंका आहे. याकरिता त्यांना थांबवण्यात आल्याचे बोलले जात आहे. (Ashish Deshmukh News)

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने (Bjp) आशिष देशमुख यांना स्टार प्रचारक नेमले होते. सोबतच व्हीआयपींच्या दौऱ्याच्या नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या स्टार प्रचारकाच्या यादीत त्यांचा समावेश नाही. आशिष देशमुख (Ashish Deshmukh) भाजपचे सह प्रमुख प्रवक्ते, ओबीसी सेलचे प्रदेश संयोजकसुद्धा आहेत. काँग्रेसमध्ये असताना देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दक्षिण-पश्चिम नागपूरमधून निवडणूक लढवली होती.

पराभवानंतर त्यांनी काँग्रेस नेत्यांवर तोंडसुख घेणे सुरू केले होते. थेट राहूल गांधी यांनी ओबीसींची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी जाहीरपणे केली होती. त्यानंतर काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केले होते. ते पुन्हा भाजपमध्ये परतले. राज्य ओबीसी सेलेच्या प्रदेश संयोजकपदी त्यांनी भाजपने नियुक्ती केली होती. सुरुवातीला सावनेरमधून ते निवडूक लढतील, असे बोलले जात होते.

यापूर्वी याच मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सुनील केदारांना चांगलीच झुंज दिली होती. नंतर त्यांनी आपला मोर्चा काटोलमध्ये वळवला. काटोलमधून तिकीट मिळणारच अशी आशा त्यांना होती. मात्र भाजपच्या बड्या नेत्यांनी त्यांना उमेदवारी देण्यास नकार दिला असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT