Mumbai News : विधानसभा निवडणुकीची सध्या जोरदार रणधुमाळी पहावयास मिळत आहे. सुरुवातीच्या टप्प्यातच प्रचाराने चांगलाच वेग घेतला आहे. मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गुरुवारी गुरुपुष्यमृताच्या मुहूर्तावर अनेक जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी महाविकास आघाडीचे जागावाटप काही जागेवरून रखडले आहे.
महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास ठरला आहे. त्यामध्ये 270 जागांचे वाटप ठरले आहे. त्यानुसार काँग्रेस 90, शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे पक्ष 90 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 90 जागा असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला असल्याचे समजते.
शिवसेना ठाकरे गटाने 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाने 45 जागा तर काँग्रेसने 48 जागेवरील उमेदवार जाहीर केले आहेत. तर तीन पक्षाला उर्वरित जागेवरील उमेदवारांची घोषणा करायची आहे. मात्र, हा जागावाटपाचा तिढा काही जागांवरून रखडला आहे.
या तिढा असलेल्या जागामध्ये विदर्भातील रामटेक दर्यापूर, मराठवाड्यातील परंडा, औसा पश्चिम महाराष्ट्रातील पंढरपूर, दक्षिण सोलापूर, श्रीगोंदा, सांगोला व मुंबईमधील वांद्रे पूर्व, अणुशक्तीनगर, वर्सोवा या जागेवरून महाविकास आघाडीतील तीन घटक पक्षात वाद सुरु आहेत. त्यामुळे या जागेवरील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान, या दहा जागेवरील तिढा सोडविण्यासाठी दिल्ली दरबारी चर्चा सुरु आहे. यावर दिल्ली दरबारी चर्चा झाल्यानंतर या जागेवरील उमेदवार जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे आता यावर दिल्ली दरबारी काय निर्णय हॊणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, दोनच दिवसापूर्वी शिवसेना ठाकरे पक्षाने महाविकास आघाडीत तिढा असलेल्या अनेक जागेवरील उमेदवार ठरविले असल्याने ठिणगी पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे इतर पक्षातील व स्वपक्षातील अनेक नव्या चेहऱ्यांना संधी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.