Bachchu kadu Sarkarnama
विदर्भ

Bachchu Kadu News: बच्चू कडू यांना मोठा दिलासा; न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; काय आहे प्रकरण?

Politics : बच्चू कडू यांची निर्दोष मुक्तता केली असली तरी त्यांना तब्बल 'एवढा' दंड भरावा लागणार

सरकारनामा ब्यूरो

Dharashiv News : माजी राज्यमंत्री आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा परिषदेमध्ये आंदोलन करताना पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

याच दाखल गुन्ह्यातून धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने बच्चू कडू यांच्यासह अन्य चार जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र, बच्चू कडू यांची निर्दोष मुक्तता केली असली तरी त्यांना अडीच हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

काय आहे प्रकरण?

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा परिषदेमध्ये नोव्हेंबर 2015 साली आंदोलन करण्यात आलं होतं. दिव्यांगांसाठी राखीव असलेला तीन टक्के निधी हा खर्च करण्यात आला नव्हता. त्यामुळे त्यांनी हे आंदोलन केले होते.

यावेळी बच्चू कडू आणि त्यांच्या बरोबर असणारे आंदोलक थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात शिरले. त्यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याशी बच्चू कडू यांनी हुज्जत घातली.

तसेच यावेळी अर्वाच्य भाषेत पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यानंतर त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

यानंतर धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली. यामध्ये बच्चू कडू यांच्यासह प्रहार संघटनेच्या अन्य चार जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT