Dharashiv News : राष्ट्रवादी नेत्याच्या एका फोनमुळे शिंदे गटाला मिळाली अर्धी सत्ता

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये उभी फूट पडली असून त्यांचे दोन गट झाले. त्यामुळेच पक्षाच्याच शुभांगी देशमुख यांचा पराभव झाल्याची चर्चा रंगली आहे.
NCP -Shinde Group
NCP -Shinde GroupSarkarnama

ईट (जि. धाराशिव) : राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) दोन नेत्यांमधील मतभेदामुळे भूम तालुक्यातील सर्वांत मोठ्या ईट ग्रामपंचायतीत (Gram panchayat) नुकतेच सत्तांतर झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उपसरपंचाला राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या एका नेत्याने वेगळी भूमिका घेतल्याने पक्षाच्याच उमेदवाराला पराभवाचे तोंड पहावे लागले. संबंधित नेत्याने एका ग्रामपंचायत सदस्याला फोन केला आणि निवडणुकीचा सर्व माहोलच बदलला. त्या एका फोनमुळे शिवसेनेला (Shivsenaशिंदे गट) तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीची अर्धा सत्ता मिळाली आहे. (Shinde group got half of the power due to Phone Call of big NCP leader)

मागील निवडणुकीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडी यांच्यात चुरशीची लढत झाली होती. त्यात नागरिकांनी आपला कौल हा आघाडीच्या हाती सोपवला होता. सत्ता मिळाली; पण त्यांचा संसार जास्त दिवस चालला नाही. अवघ्या दोन वर्षांतच सत्ता परिवर्तन झाल्याचे पाहावयास मिळाले.

NCP -Shinde Group
Bhaskar Jadhav News : शिंदे गटात येण्यासाठी भास्कर जाधव अनेकदा फोन करायचे : मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाचा खळबळजनक दावा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्या उपसरपंच रुक्मिणी डोके यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिला आणि ईटच्या राजकारणात मोठी खळबळ उठाली. त्यानंतर उपसरपंचपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शुंभागी सुनील देशमुख यांनी, तर शिवसेनेकडून (शिंदे गट) प्रज्ञा प्रमोद देशपांडे यांनी उमेदवारी अर्ज भरले. ही लढत अत्यंत चुरशीची होती. मतदान प्रक्रियेत ग्रामपंचायतीचे १५ सदस्य उपस्थित होते. निवडणुकीत शुभांगी देशमुख यांना (सात), तर प्रज्ञा देशपांडे यांना (आठ) मते मिळाली. शिंदे गटाच्या प्रज्ञा देशपांडे यांच्या गळ्यात उपसरपंचपदाची माळ पडली.

ईटच्या ग्रामस्थांनी आपला कौल हा राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना दिला होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांतील अंतर्गत मतभेदामुळे ही सत्ता दोन वर्षांमध्येच संपुष्टात आली. सध्या ईटचे सरपंचपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे, तर उपसरपंच हा शिवसेनेचा (शिंदे गट) आहे. राज्यात भाजप व शिवसेना (शिंदे गट) एकत्र सत्तेत आहे. परंतु येथील ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी व शिंदे गट एकत्र आले आहेत.

NCP -Shinde Group
Marathwada News : उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांनी प्रतिष्ठेच्या निवडणुकीत विजय खेचून आणला : मराठवाड्यात पुन्हा गड राखला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये उभी फूट पडली असून त्यांचे दोन गट झाले. त्यामुळे ईट येथे शिंदे गटला सत्तेत अर्धा हिस्सा मिळाला, तर भाजप व राष्ट्रवादीचा एक गट विरोधात राहिला आहे. दरम्यान, उपसरपंचपदाच्या निवड प्रक्रिये वेळी एका बड्या नेत्याचा फोन एका ग्रामपंचायत सदस्याला आला आणि सर्व चित्र बदललं, त्यामुळे राष्ट्रवादीच्याच शुभांगी देशमुख यांचा पराभव झाल्याची चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com