NCP Satish Itkelwar
NCP Satish Itkelwar Sarkarnama
विदर्भ

Mahavikas Aghadiकडून चौथा उमेदवार रिंगणात, इटकेलवार म्हणतात आता माघार नाही !

सरकारनामा ब्यूरो

Nagpur Division Teacher Constituency Election : नागपूर (Nagpur) विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक म्हणजे अनिश्‍चिततेचा खेळ होऊन बसली आहे. कॉंग्रेसचा उमेदवार कोण किंवा पाठिंबा कुणाला, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. असे असताना सतीश इटकेलवार यांनी आज नामांकन अर्ज दाखल करून निवडणुकीच्या रणधुमाळीत धूम उडवून दिली आहे.

या निवडणुकीची (Election) तयारी आजची नाही, तर गेल्या कित्येक महिन्यांपासून तयारी करत आहो. माझी दावेदारी म्हणजे आमच्या पक्षाचे मन वळवण्याचा हा एक प्रयत्न आहे. कारण जवळपास सर्व संघटनांचे समर्थन मिळाले आहे. संघटनांच्या प्रमुखांनी जरी सांगितले नसले, तरी त्यांच्या लोकांनी ही निवडणूक लढवण्यासाठी मला सांगितले आहे.

भाजप (BJP) समर्थीत शिक्षक परिषद असो, शिक्षक भारती वा शिक्षक सेना या संघटनांच्या पाठबळावर आणि वैयक्तिक संबंधांच्या भरवशावर ही निवडणूक जिंकू, असा विश्‍वास आज नामांकन दाखल केलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते सतीश ईटकेलवार यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना व्यक्त केला.

महाविकास आघाडीत चाललंय तरी काय, या प्रश्‍नाचे उत्तर आता १६ जानेवारीला नामांकन परत घेण्याच्या दिवशी माहिती होणार आहे. महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार दिल्यानंतरही राष्ट्रवादीकडून सतीश इटकेलवार यांनी अर्ज दाखल केल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली, हा संदेश सर्वत्र गेला आहे. महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या गटांचे चार उमेदवार आता रिंगणात आहेत. शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, उद्धव ठाकरे गटाचे गंगाधर नाकाडे, काग्रेस प्रणीत शिक्षक संघटनेचे सुधाकर अडबाले यांनी आधीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सतीश इटकेलवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नागपूरचे प्रवक्ते आणि ओबीसी सेलचे प्रमुख आहेत. आज नामांकन अर्ज दाखल करून त्यांनी महाविकास आघाडीमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण केली आहे. आता पक्षाने काय ते ठरवायचे आहे आणि त्यासाठी १६ जानेवारीपर्यंत वेळ आहे. पक्षाने योग्य निर्णय घ्यावा. कारण आता आपली माघार नाही, लढणार म्हणजे लढणारच, असा निर्धार इटकेलवार यांनी जाहीर केला आहे. नाना पटोले यांनी नागपूर पदवीधरची पुनरावृत्ती करण्याच्या दिशेने पावले टाकली. पण महाविकास आघाडीतूनच चार उमेदवार उभे झाल्यास ते शक्य नाही. अशा परिस्थितीत नागो गाणार यांचा मार्ग मोकळा होणार, हे निश्‍चित मानले जात आहे. पक्षश्रेष्ठी यावर काय तोडगा काढतात, याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT