Patan : 'महाविकास'चे सरकार पुन्हा आलेलेही कळणार नाही...जयंत पाटलांचा विश्वास

Jayant Patil पाटण तालुक्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मेळावा झाला
Jayant Patil
Jayant Patilsarkarnama
Published on
Updated on

Patan News : शिंदे, फडणवीस सरकार पंचायत समिती, जिल्हा परिषद व मुंबई महापालिका निवडणुका पुढे ढकलतय. सरकार घाबरलेले असून सत्ता मिळाल्यापासून हुकुमशाही प्रवृत्तीने वागत आहे. धीर धरा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar आपल्या पाठीशी आहेत. कुटील कारस्थानात आघाडी सरकार जसे गेलेले कळाले नाही. तसेच काही कालावधीत परत आलेले ही कळणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील Jayant Patil यांनी व्यक्त केला. सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीला कंटाळून लोक सत्यजित पाटणकरांना मतदान करतील, असे ही त्यांनी स्पष्ट केले.

काळोली (ता. पाटण) येथील ऋचा मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित ग्रामपंचायत, विकास सेवा सोसायट्या यांच्या निवडणूकीतील विजयी व पराभूत उमेदवारांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, युवानेते सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे मीडियासेल प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, राजाभाऊ शेलार, मोहनराव पाटील, बापूराव जाधव, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

जुन महिन्यात झालेल्या राजकीय घडामोडीत राजकीय लाभापेक्षा खोक्यांचा लाभ महत्वाचा होता. खोक्यांच्या पलिकडे जाऊन विचार न केल्याने सत्तांतर झाले. सर्व व्यवस्थांवर दबाव आणला जात आहे असे स्पष्ट करून जयंत पाटील म्हणाले, व्यवस्था खिशात घालून चाललेला कारभार पाटणवासीय भोगत आहेत. असा दबाव असतानाही कार्यकर्ते लढले त्यांना धीर देण्यासाठी मी आलेलो आहे.

Jayant Patil
Satara : ठाकरे सेना तुम्हीच राष्ट्रवादीच्या मांडीवर नेऊन बसवली... शंभूराज देसाई

निवडून आलेल्यांना निरोप येतील, आमिष दाखविले जाईल, त्यास बळी पडू नका. महापुरुषांची जाणीवपूर्वक बदनामी करून मुख्य प्रश्नांवरील लक्ष वळविण्याचा भाजप प्रयत्न करत आहे. माणसांची डोकी भडकावली जात आहेत. खंडणी मागणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.

Jayant Patil
Satara : साखर कारखानदारीला उभारी द्या : शिवेंद्रराजेंनी घेतली केंद्रीय उद्योग मंत्र्यांची भेट

मुख्यमंत्री यांच्यासह १६ जणांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. ज्यांना मंत्रीपद मिळाले नाही ते मुख्यमंत्री यांच्या डावी व उजवीकडील कधी अडचणीत येतात याची वाट पाहत आहेत. मुख्यमंत्री ४० टिकवण्यासाठी धडपडत असुन मागेल त्याला देत आहेत. हे सरकार सर्वसामान्य जनतेच्या हिताचे नाही. त्यामुळे शिंदे भाजपच्या सरकारचा सर्वांनी मिळून बिमोड करायचा आहे.

Jayant Patil
Eknath Shinde News: त्यावेळी ‘वर्षा’वर पाटीभर लिंबं सापडली होती : एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com