Gadchiroli Loksabha  Sarkarnama
विदर्भ

Gadchiroli BJP News : लोकसभा प्रमुखपदी किसन नागदेवे, तर राजे अम्ब्रीशरावांवर अहेरीची जबाबदारी !

Aheri : जिल्ह्याचे माजी पालकमंत्री असलेले अम्ब्रीशराव आत्राम अहेरी राजघराण्यातील आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Gadchiroli BJP Lok Sabha Elections Chief News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने राज्यातील लोकसभा व विधानसभा प्रमुखांच्या नियुक्त्यांची यादी जाहीर केली आहे. गडचिरोली लोकसभा मतदारसंघ प्रमुख म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Under his leadership, BJP has made a lot of progress in the district)

विधानसभा प्रमुखांमध्ये प्रकाश पोरेड्डीवार, अम्ब्रीशराव आत्राम, प्रमोद पिपरे यांचा समावेश आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील लोकसभा प्रमुख व विधानसभा प्रमुखांची यादी जाहीर केली आहे. चिमूर- गडचिरोली लोकसभा प्रमुख म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आरमोरी विधानसभा प्रमुख म्हणून प्रकाश पोरेड्डीवार, अहेरी विधानसभा प्रमुख म्हणून अम्ब्रीशराव आत्राम आणि गडचिरोली विधानसभा प्रमुख म्हणून प्रमोद पिपरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त लोकसभा प्रमुख किसन नागदेवे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वात भाजपने जिल्ह्यात बरीच प्रगती केली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्येही किसन नागदेवे यांच्या नेतृत्वात भाजपने चांगले यश मिळवले. आरमोरी विधानसभा प्रमुख म्हणून नियुक्त झालेले प्रकाश पोरेड्डीवार यांचा राजकारणासह सहकार क्षेत्रात प्रचंड दबदबा आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपने आरमोरी आणि गडचिरोली विधानसभेत केलेल्या चमकदार कामगिरीचे श्रेय प्रकाश पोरेड्डीवार यांनाच जाते.

जिल्ह्याचे माजी पालकमंत्री असलेले अम्ब्रीशराव आत्राम अहेरी राजघराण्यातील असून या विधानसभा क्षेत्रात ते सक्रिय आहेत. गडचिरोली विधानसभा प्रमुख झालेले प्रमोद पिपरे गडचिरोली जिल्ह्यात भाजपची मुहूर्तमेढ रोवण्यापासून सोबत आहेत. ते पक्षाचे जिल्हा महामंत्री असून ज्येष्ठ, अनुभवी नेते असल्याने त्यांना ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

वर्षभरावर लोकसभा निवडणूक आली आहे. तर, त्यानंतर विधानसभेचीही निवडणूक काही दिवसांनी येत आहे. या दोन्ही निवडणुकांच्या (Elections) तयारीच्या दृष्टीने भाजपने (BJP) एक पाऊल टाकले आहे. निवडणुकीच्या तयारीत भाजप नेहमीच पुढे असतो. आम्ही निवडणूक आल्यावर तयारी करत नाही, तर नेहमी तयारच असतो, असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) नेहमीच सांगत असतात. कृतीतूनही भाजपने हे दाखवून दिले आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT