Nitin Gadkari and Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

Gadkari - Fadanvis News : नागपूरची नाव पाण्यातच, फडणवीसांवर ‘या’ कारणामुळे भडकले ‘स्मार्ट सिटी’कर !

Nagpur : शनिवारचा दिवस नागपूरकर आणि सत्ताधारी भाजप दोघांसाठीही जड गेला.

Atul Mehere

Nagpur Political News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या जोडीने उपराजधानी नागपूरचा कायापालट केला, असा दावा भाजप करते. या दाव्याच्या जोडीला अनेक विकासकामांचे पुरावेही देते. परंतु शनिवारचा (ता. २३) दिवस नागपूरकर आणि सत्ताधारी भाजप दोघांसाठीही जड गेला. (Saturday was a tough day for both the Nagpurkars and the ruling BJP)

सोशल माध्यमांवर संत्रानगरीतील नागरिकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलाच राग व्यक्त केला. त्याला निमित्त ठरले शुक्रवारी रात्री सहा तासांत झालेली अतिवृष्टी. उपराजधानी नागपुरात समुद्र नाही. मोठी वाहती नदीही नाही, तरी २४ तासांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शुक्रवारी रात्रीपासून शहरातील अनेक भागांत पावसाचे पाणी शिरले.

पावसाचा कहर आणि सांडपाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने शुक्रवारी रात्रीपासून नागपूर शहर पुराच्या पाण्याखाली गेले. एसडीआरएफ, एनडीआरएफ, सैन्याच्या मदतीने लोकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले. पुराचा तडाखा इतका जबरदस्त होता की, बहुतांश भागात मोटार बोट आणि होड्यांच्या मदतीने बचावकार्य करावे लागले. या सगळ्यांचा संताप ‘स्मार्ट सिटी’करांनी सोशल माध्यमांवर व्यक्त केला आणि लक्ष्य केले ते गडकरी व फडणवीस यांना.

नागपूर महापालिकेवर भाजपचे वर्चस्व आहे. राज्यातही भाजपची सत्ता आहे. केंद्रात तर सलग दोन टर्म कमळ फुलले आहे. असे असतानाही नागपूर पूर व्यवस्थापनाच्या बाबतीत तोंडघशी कसे पडू शकते, असा प्रश्न नागरिकांनी गडकरी, फडणवीस यांना सोशल माध्यमांवर टॅग करीत उपस्थित केला.

यापूर्वीही अनेकदा नागपुरात अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यापूर्वी एकदा हिवाळी अधिवेशन सुरू असताना नागपुरात अतिवृष्टीमुळे मोठा पूर आला होता. त्यानंतरही महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारने कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही, असे शनिवारच्या पूर परिस्थितीवरून ठामपणे म्हणता येईल.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरापासून जवळच असलेल्या नरेंद्र नगर रेल्वे अंडरब्रीजचा प्रश्नही असाच आहे. अंडरपासमध्ये नाल्याचे पाणी जमा होत असल्यामुळे येथे भर उन्हाळ्यातही रस्ता बंद होतो. पावसाळ्यात तर या मार्गावरील वाहतुकीबाबत विचारणा न केलेलीच बरी. महापालिकेतील भाजपच्या एका नेत्याने हा प्रश्न निकाली काढण्याचे आव्हान स्वीकारले होते. तसा शब्दही त्यांनी जाहीरपणे दिला होता. परंतु तेदेखील फेल झालेत.

नरेंद्र नगर अंडरपासच्या मुद्द्यावर आणि त्यानंतर निवडणुकीतही. नागपुरातील नाग नदीत होडीने प्रवास करण्याचे स्वप्न आहे, असे गडकरी नेहमीच आपल्या भाषणांमधून सांगतात. शनिवारी नागपुरात पूर आल्यानंतर नागरिकांनी नेमक्या याच विषयांवर मिम्स तयार केल्या व त्या ट्विटरवर व्हायरलही केल्या. आजही नागपुरात भाजप खासदार, आमदार, माजी आमदारांच्या नावाची भली मोठी यादी आहे. परंतु नियोजनशून्यतेमुळे अद्यापही नागपूरची नाव पाण्यातच आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT