Mumbai News : नागपूरात शुक्रवारी ढगफुटीमुळे हाहाकार माजवला. तिघांचा बळी गेला, मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हे सत्ताधारी भाजपच्या भ्रष्ट, गलथान आणि अनियंत्रित कारभाराचे पाप आहे, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला. सरकारने पूरग्रस्तांना दिलेली मदत अत्यंत तोकडी आहे. नुकसान झाले, तेवढे नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली. (Latest Political News)
'अतिवृष्टीमुळे नागपुरातील सुमारे दहा हजाराहून अधिक घरांमध्ये पाणी शिरले. प्रचंड मोठे नुकसान झाले. त्या तुलनेत राज्य सरकारची मदत अत्यंत तुटपुंजी आहे, याकडे पटोलेंनी लक्ष वेधले. ही पूरस्थिती ही गेल्या काही वर्षातील नागपूर महापालिका आणि राज्यातील विद्यमान भाजप सरकारच्या भ्रष्ट, गलथान आणि अनियंत्रित कारभाराचे पाप आहे,' असा हल्लाबोल त्यांनी केला. (Maharashtra Political News)
'सरकारने रहिवाशांना प्रत्येकी दहा हजार आणि दुकानदारांना पन्नास हजारापर्यंत मदत देण्याचे जाहीर केले आहे. पण, ती अत्यंत तुटपुंजी आहे. कारण, प्रत्यक्षात झालेले नुकसान फार जास्त आहे. त्यामुळे पंचनामे करून जेवढे नुकसान झाले आहे, तेवढी भरपाई दिली पाहिजे, अशी मागणीही (Nana Patole) नाना पटोलेंनी केली आहे.
'स्वतःला विकासपुरुष म्हणून घेणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाचा दिखावा केला. नागपूर शहरात बगलबच्च्यांना कंत्राटे देऊन काँक्रीटचे जंगल उभे केले. त्यामुळे शहराचा विकास होण्याऐवजी ते बकाल झाले आहे. एका दिवसाच्या पावसाने फडणवीस आणि गडकरींच्या विकासाच्या पोकळ गप्पा, बोगस दावे आणि भाजपचा भ्रष्ट कारभार उघडा पडला,' असे टोलेही पटोलेंनी लगावले आहेत.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.