Vidarbha News: गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या नागपूर येथील कार्यालयात एकाने फोन करुन खंडणीसाठी धमकी दिली होती. या प्रकरणी बेळगाव येथील तुरुंगात असलेल्या जयेश पुजारीला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरु केली.या चौकशीत काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. (Gadkari Threatened, Karnataka Deputy CM Killed; Shocking revelations of Jayesh Pujari)
नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे असल्यानेच जयेशने त्यांना लक्ष्य होतं. धक्कादायक म्हणजे त्याने कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्र्यांच्या हत्येची देखील सुपारी घेतल्याचं तपासात समोर आलं आहे. याशिवाय, तुरुंगात सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी दरमहा चार ते पाच लाख रुपये दहशतवादी संघटनांकडून जयेशला मिळत असल्याचही पोलीस तपासातून समोर आलं आहे.
जयेश पुजारीचा संबंध पीएफआय, लष्कर-ए-तैयबा यांसारख्या दहशतवादी संघटना आणि दाऊद इब्राहिम टोळीच्या लोकांशीही आहे.कारागृहात त्याच्याकडून पोलिसांना एक डायरी सापडली होती, ज्यामध्ये नेते आणि मंत्र्यांचे नंबर होते. पोलिसांनी डायरी ताब्यात घेतली असून फोन कुठून आला याचा तपास करत आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांनी दोन वेळा धमकीचे फोन आले. नागपूर येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात धमकीचे हे फोन आले आहेत. १ एप्रिल रोजी दहा कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या कॉलप्रकरणी पुजारी उर्फ कांथा याला नागपूरच्या धंतोली पोलिसांच्या ताब्यात घेत चौकशी सुरु केली.त्यानंतर हे प्रकरण लवकरच केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. दरम्यान, जयेश पुजारीला (Jayesh Pujari) कोर्टाने एका खून प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात तो बेळगावच्या तुरुंगात शिक्षा भोगत होता.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.