Virar News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी(दि.१४) राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. रॅली सलग 18 तास अभ्यास यांसारख्या विविध अभिनव उपक्रमांचं आयोजन करुन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येत आहे. मात्र, याचवेळी एक दु:खद घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेनं विरार परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
विरारमधील कारगिल नगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर( Dr.B.R.Ambedkar Jayanti) जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. या ठिकाणी मिरवणुकीवेळी इलेक्ट्रिक वायरला झेंड्याचा स्पर्श झाल्यानं स्फोट झाला. या दुर्घटनेत दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहे.
रुपेश सुर्वे ( वय 30), सुमित सुध (वय 23) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. तर स्मित कांबळे (वय 32) सत्यनारायण पंडित (वय 23), उमेश कानोजिया (वय 18), राहुल जगताप (वय 18) रोहीत गायकवाड अशी जखमींची नावे आहेत.
नेमकं काय घडलं ?
विरार पूर्व कारगिल नगर येथे अकरा वाजण्याच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला निघालेली मिरवणूक संपवून परत जात असताना लोखंडी झेंड्याच्या पाईपचा विजेच्या ट्रान्सफार्मरला स्पर्श झाल्यानं स्फोट झाला. यात सहा जण गंभीर भाजले असून, यातील दोन जणांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. तर तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.