Balasaheb Thackeray Apala Dawakhana Sarkarnama
विदर्भ

Gondia News : सरकारच्या दुर्लक्षामुळे ‘आपला दवाखाना’ ‘आपुलकी’च्या उपचारातून बाद !

Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदे येऊन ‘आपला दवाखाना’चे उद्घाटन करून गेले.

अभिजीत घोरमारे

Gondia News : शहरी भागातील नागरिकांना त्यांच्याच वॉर्डात आरोग्यविषयक सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य शासनाकडून 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' योजना सुरू करण्यात आली आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे येऊन ‘आपला दवाखाना’चे उद्घाटन करून गेले. याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात मुख्यालयासह तालुका मुख्यालयात आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे.

या दवाखान्यात मोफत उपचार उपलब्ध आहेत. शहरी भागात शासकीय, तसेच खासगी रुग्णालये मोठ्या संख्येने असतात. लोकांना आपल्या वॉर्डात आरोग्याची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी 'आपला दवाखाना' आहे. गोंदिया शहरातील सहाही वार्डांत ‘आपला दवाखाना’मध्ये रुग्णांवर उपचार केला जातो. 1 मे 2023 पासून सुरू झालेल्या या दवाखान्यात आठ महिन्यांत 15 हजारांवर रुग्णांचा उपचार करण्यात आला आहे.

‘आपला दवाखाना’ला घरघर लागू लागली आहे. सर्वसाधारण आजारांसह नेत्रचिकित्सा, स्त्री रोग तज्ज्ञ, वैद्यकीय तपासणी तज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, त्वचारोग तज्ज्ञ, दंतशल्य चिकित्सा, बालरोग तज्ज्ञ अशा आरोग्य सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे, परंतु प्रत्यक्षात या सोयीसुविधा उपलब्ध करण्यास शासनाकडून दिरंगाई होत आहे. सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी डॉक्टरांचा आसरा घ्यावा लागत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रुग्णांच्या औषधोपचारांचा खर्च अधिक वाढला आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या दवाखान्याचा उपयोग गोरगरिबांसाठी होतो का, असा प्रश्न तर विचारला जात आहे. राज्य शासनाने बाळासाहेब ठाकरे 'आपला दवाखाना' ही योजना सुरू केली असली तरी या दवाखान्यासाठी स्वतंत्र इमारती नाहीत. शहरांसह तालुक्यांमध्ये बहुतांश ठिकाणी भाड्याच्या खोल्यांमध्ये 'आपला दवाखाना' आहे.

या दवाखान्यांसाठी स्वतंत्र इमारत उपलब्ध करून देण्याबाबत शासनाचा काही विचार आहे काय, याबाबत स्पष्ट धोरण दिसून येत नाही किंवा त्याबाबत अजूनही हालचाली झालेल्या नाहीत. दुसरीकडे या दवाखान्यांचे खासगी भाडे देण्यास सरकार तयार नसल्याने घरमालक अशा दवाखान्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी तयार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आपल्या दवाखान्यात ‘आपुलकी’चा उपचार मिळत नसल्याची ओरड आता होऊ लागलेली आहे.

Edited By : Atul Mehere

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT