OBC Sarkarnama
विदर्भ

Gondia OBC News : ओबीसीच्या जनगणनेसाठी जिल्ह्यात पोहोचली यात्रा !

अभिजीत घोरमारे

ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यासंदर्भात सात जिल्ह्यांतून ओबीसी जनगणना यात्रा काढण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथून 3 फेब्रुवारी रोजी यात्रेला सुरुवात झाली असून, काल 6 फेब्रुवारीला ही यात्रा गोंदिया जिल्ह्यात दाखल झाली. तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथून या यात्रेला सुरुवात होऊन सायंकाळी ही यात्रा गोंदिया तालुक्यातील कामठा येथे पोहोचली.

आज (ता. ७) पुन्हा सडक अर्जुनीवरून ही यात्रा आपल्या इच्छितस्थळी निघाली आहे. ओबीसींच्या हक्कासाठी जनगणना व्हावी व आरक्षणात घुसखोरी होऊ नये, यासाठी या यात्रेला ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद दिला. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणा तपासण्यासाठी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यामार्फत 23 जानेवारीपासून सर्वेक्षण करण्यात येत आहे.

ओबीसी राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालय खटला, रोहिणी आयोग, भारत सरकार व नीती आयोग नेहमी ओबीसी डेटाची मागणी करते. परंतु 1931 पासून आतापर्यंत ओबीसींची जातीनिहाय जनगणना न झाल्यामुळे भारत सरकारकडे डेटा उपलब्ध नाही. यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत अडचण येत असून, मंडल आयोगाने ठरविलेल्या 52 टक्के ओबीसी समाजावर अन्याय होत आहे. ओबीसींची जनगणना व्हावी, यासाठी सातत्याने मागणी केली जात आहे. मात्र, याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.

ओबीसी बांधवांत जनजागृती व्हावी, या उद्देशाने सेवाग्राम येथून ओबीसी संकल्प यात्रा काढण्यात आली आहे. यात्रेचे काल जिल्ह्यात आगमन झाले. दरम्यान मुंडीकोटा, पांजरा, सरांडी, विहीरगाव, बिरसी फाटा, बडेगाव, खुर्शीपार, बेरडीपार मार्गे डाकराम सुकळी येथे सभा घेण्यात आली. यानंतर यात्र गोरेगाव तालुक्यात कुन्हाडी मार्गाने खाडीपार, कुऱ्हाडी, कवलेवाडा मार्गे चुटीया, दासगाव, काटी, रावणवाडी मार्गे कामठा, भोसाकडे निघाली.

7 फेबुवारीला सकाळी 9 वाजता भोसा, कालीमाटी, आमगाव, कावराबांध, सालेकसा, साखरीटोला, तिगाव, तुमसर, तिल्ली मोहगाव, जांभळी, पळसगाव डव्वा येथून सडक अर्जुनी तालुक्यातून सौंदड मार्गाने साकोलीकडे जाणार जात आहे.ओबीसी अधिकार मंचचे उमेश कोराम यांच्या नेतृत्वात या यात्रेचे आगमन झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वेळी ओबीसी अधिकार मंच संयोंजक खेमेंद्र कटरे, अशोक लंजे, कृती समितीचे कैलास भेलावे, राजीव ठकरेले, राजू चामट, ओम पटले, उमेश कटरे, सी.पी. बिसेन, प्रेमलाल साठवणे, रवि भांडारकर, जि.प. सदस्य जगदिश बावनथडे, माजी जि. प. सदस्य मदन पटले आदी उपस्थित आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT