Gondia News : पोषण आहाराबाबत कर्मचारी ‘अपडेट’ झालेच नाहीत

Lack Of Phones : जिल्ह्यात अद्यापही पोहचले नाहीत ‘स्मार्टफोन’
School Nutrition Food Scheme
School Nutrition Food SchemeSarkarnama
Published on
Updated on

School Nutrition Food Scheme : गोंदिया जिल्ह्यातील 1 हजार 850 कर्मचारी जिल्ह्यात अद्यापही स्मार्ट फोन पोहचलेले नाहीत. त्यामुळे शालेय पोषण आहाराच्या कामात अडथळा येत आहे. पोषण आहाराची माहिती अद्यापही अपडेट झालेली नाही. याचा परिणाम जिल्ह्यातील वितरणावर पडू लागला आहे.

विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी जवळपास 2 महिने बेमुदत कामबंद आंदोलन केले. त्यानंतर शासनाने दखल घेत अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. राज्य शासनाने अडचणींना बघून अंगणवाडी तथा मिनी अंगणवाडी सेविकांना नवीन ‘स्मार्टफोन’ देण्याची घोषणा केली.

School Nutrition Food Scheme
Gondia's Former Minister : गोंदिया जिल्ह्यातील भाजपच्या माजी मंत्रिमहोदयांना कशाची वाटतेय भीती?

सरकारच्या या घोषणेला आता आठवडा लोटत आला आहे. मात्र गोंदिया जिल्ह्यातील जवळपास 1 हजार 850 अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या हाती अद्यापही ‘स्मार्टफोन’ आलेला नाही. पोषण अभियान उत्कृष्टपणे राबविण्यासाठी राज्य शासनामार्फत अंगणवाडी सेविकांना ‘स्मार्टफोन’ दिले जातात. 2023-24 मध्ये राज्यातील 1 लाख 10 हजार 486 अंगणवाडी सेविका, 3 हाजर 899 मुख्यसेविका, पर्यवेक्षिका, 589 तांत्रिक कर्मचारी यांच्यासाठी एकूण 1 लाख 14 हजार 974 ‘स्मार्टफोन’ उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

त्यामुळे राज्य सरकारमार्फत सुरू करण्यात येणारे नावीन्यपूर्ण उपक्रम ‘स्मार्टफोन’द्वारे लागू करता येतील. पोषण आहार ‘ट्रॅकर एप्लीकेशन’द्वारे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी ‘स्मार्टफोन’द्वारे ‘रियल टाइम मॉनिटरींग’ पद्धतीने करण्यात येणार आहे. मात्र यापुर्वीचा ‘स्मार्टफोन’ वापरताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बराच त्रास सहन करावा लागला. त्यामुळे नवीन ‘स्मार्टफोन’सह वेतनवाढ, नियमित कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा यासाठी अंगणवाडी सेविकांनी कामबंद आंदोलन पुकारले. राज्य शासनाने यातील अनेक मागण्या मान्य केल्या. त्यानंतर कर्मचारी कामावर रूजूही झालेत. मात्र अद्यापही गोंदिया जिल्ह्यात ‘स्मार्टफोन’ पोहचले नसल्याने कर्मचाऱ्यांवरील कामाचे संकट कायम आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यातील अंगणवाडी सेविकांना ‘स्मार्टफोन’ वितरण कार्यक्रम काही दिवसांपूर्वी पार पडला. संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांना ‘स्मार्टफोन्स’चे वितरण झाले. संयुक्त राष्ट्रसारख्या सर्वोच्च जागतिक संस्थेच्या अध्यक्षांच्या हस्ते हा ‘स्मार्टफोन’ मिळाल्यावर या सेविकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. आनंदही झाला. डेनिस फ्रान्सिस यांनी देखील उत्सुकतेने या उपक्रमाची माहिती मुख्यमंत्र्यांकडून घेतली. कार्यक्रमानंतर या सेविकांच्या विनंतीचा स्वीकार करून एकत्रित छायाचित्र देखील काढून घेतले.

मुख्यमंत्र्यांनी समयसूचकता दाखविल्याबद्दल अंगणवाडी सेविकांनी आणि महिला व बाल कल्याण अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले. मात्र अद्यापही गोंदिया जिल्ह्यातील 1 हजार 800 अंगणवाडी तसेच 50 मिनी अंगणवाडी सेविकांना ‘स्मार्टफोन’ हाती मिळालेला नाही. त्यामुळे ‘अपडेट’ होण्यासाठी अंगणवाडी सेविका आता या ‘स्मार्टफोन’ची प्रतीक्षा आहे.

Edited By : Prasannaa Jakate

School Nutrition Food Scheme
Gondia Teacher News : खासगी संस्थाचालकही करेना पवित्र पोर्टलमार्फत भरती !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com