Yavatmal, Activists who have been stationed Sarkarnama
विदर्भ

Shasan Aaply Dari : अनेकांना केले स्थानबद्ध; पोलिसांनी दडपशाही केल्याचा आरोप, सरकारच्या विरोधात रोष !

Maratha Reservation : मराठा आंदोलनाने आधीच वातावरण तापलेले आहे.

सतीश हरिश्चंद्र येटरे

Yavatmal District Political News : ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर येणार आहेत. या कार्यक्रमात काही कार्यकर्ते अडथळा आणण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी दडपशाही सुरू केल्याचे चित्र आहे. आज (ता. ३०) सकाळपासूनच जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांअंतर्गत राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेत स्थानबद्ध करण्यात आले. (The Maratha movement has already heated up the atmosphere)

या कारवाईनंतर पोलिसांनी दडपशाही सुरू केल्याचा आरोप होत आहे. शिवाय शासनावरही रोष व्यक्त होत आहे. मराठा आंदोलनाने आधीच वातावरण तापलेले आहे आणि त्यात यवतमाळातील कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केल्यामुळे सरकारवरही लोकांचा रोष वाढला आहे. ही परिस्थिती बघता आजच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसचे माजी नगरसेवक चंदू चौधरी, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष मनीषा काटे-भोसले यांना कळंब पोलिसांनी आज (ता. ३०) सकाळी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले. पोलिसांच्या या तुघलकी निर्णयाविरोधात कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष विभागल्याने मूळ पक्षात असलेल्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांची अडवणूक होण्याची शक्यता आहे. शिवाय शासन आपल्या दारी या कार्यक्रमात जुन्या पक्षाचे कार्यकर्ते अडथळा आणू शकतात, अशी भीती पोलिसांना आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अशा चळवळीतील कार्यकर्त्यांना पोलिसांनी रविवारी (ता. २९) नोटीस बजावलेली आहे.

नोटिशीत शासन आपल्या दारी कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून शांतता भंग केल्यास पोलिस कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. एवढेच नव्हेतर आज यवतमाळ जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतर्गत अनेक राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेत स्थानबद्ध करण्यात आलं. मुख्यमंत्री येथील कार्यक्रम आटोपून जेव्हा रवाना होतील. त्यानंतरच स्थानबद्ध केलेल्या कार्यकर्त्यांना सोडण्यात येणार आहे, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT