Rathod And Gawali News : संजय राठोड आणि भावना गवळींमध्ये युद्धविराम नाहीच, आज पुन्हा एकमेकांना टाळले !

Eknath Shinde : या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत.
Sanjay Rathod and Bhavana Gawali's Banners
Sanjay Rathod and Bhavana Gawali's BannersSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal District Political News : यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांच्यात अद्यापही समेट झालेला नाही. याची प्रचिती आज ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या निमित्ताने आली. दोघांमध्ये युद्धविराम नाहीच, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. (Chief Minister Eknath Shinde will attend this event)

आज यवतमाळ जिल्ह्यातील किन्ही येथे ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्तीसगड दौऱ्यावर आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आजारी आहेत. त्यामुळे हे दोघेही कार्यक्रमाला येणार नाहीत. आजचा कार्यक्रम एकट्या एकनाथ शिंदे यांनाच सांभाळावा लागणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या कार्यक्रमानिमित्त शिंदे - फडणवीस - पवार यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आलेले आहेत. संजय राठोड आणि भावना गवळींनीही स्वागताचे फलक लावले आहेत. पण दोघांनी आपल्या स्वागताच्या फलकावर एकमेकांचा फोटो लावलेला नाही. या फलकांची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. सद्यःस्थितीत दोघांमधून विस्तवही जात नाही. दोघांमधील विरोध दिवसागणिक वाढत चालला आहे. याचे पडसाद आगामी निवडणुकींवर पडतील, असेही सांगितले जात आहे.

संजय राठोड युतीच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. तेव्हा ते वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्रिसुद्धा होते. तेव्हापासूनच खासदार गवळी व संजय राठोड यांच्यात शीतयुद्ध शिगेला पोहोचले होते. जिल्ह्यात तेव्हा शिवसेनेचे दोन गट सरळसरळ एकमेकांसमोर बघायला मिळत होते. मागील लोकसभा निवडणुकीत दोन्ही गटांनी शांतता बाळगली होती. त्यानंतर संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याचा खासदार गवळींनी उघडपणे विरोध केला होता.

त्यावेळी मंत्रिमंडळ विस्तारात संजय राठोड यांना न घेता संजय रायमुलकर किंवा गोपीकिशन बाजोरिया यांचा समावेश करण्यासाठी गवळी सरसावल्या होत्या. तसे पत्रही त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते, पण त्यानंतरही राठोड यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली होती. याचा गवळींनी विरोध केला होता. अकोला किंवा बुलडाणा जिल्ह्याला मंत्रिपद द्यावे, अशी मागणी त्यांनी केली होती.

संजय राठोड आणि भावना गवळींनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यावर या दोघांमधील युद्धाला विराम मिळेल, अशी आशा जिल्हावासीयांना होती. पण शितयुद्धविराम होण्याऐवजी ते पुन्हा भडकत गेले. वेळोवेळी ही बाब पाहण्यात आली. आज पुन्हा दोघांमधील संघर्ष फलकांच्या माध्यमातून बघायला मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यवतमाळात येणार आहेत. या संघर्षावर ते काही तोडगा काढतात, का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Edited By : Atul Mehere

Sanjay Rathod and Bhavana Gawali's Banners
Punvat Yavatmal News : पतीचा हस्तक्षेप सरपंच महिलेला पडला महागात; सीसीटीव्हीने फोडले बिंग अन् झाली अपात्र !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com