Ladki Bahin Yojana Sarkarnama
विदर्भ

DPC funds : सरकारकडून बहिणींचे लाड, डीपीसीच्या निधीला थांब?

DPC funds mazi ladki bahin yojana : लाडकी बहीण, तीर्थक्षेत्र पर्यटन आदी योजना येत्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू करण्यात आल्याची चर्चा आहे. विरोधकही तसा आरोप करीत आहे.

Rajesh Charpe

DPC funds News : राज्याच्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणासाठी भरीव तरतूद करण्यात आली आली. लाखो महिलांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता जमासुद्धा करण्यात आला आहे. दुसरीकडे अर्थसंकल्पातील प्रस्तावित योजना, लेखाशीर्षवर अद्याप निधी टाकण्यात जमा करण्यात आला नाही.

ग्रामविकास अंतर्गत लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांसाठी निधी देण्यात आला नसून जिल्हा नियोजन समितीला पहिल्या टप्प्यातील निधी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

लाडकी बहीण, तीर्थक्षेत्र पर्यटन आदी योजना येत्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू करण्यात आल्याची चर्चा आहे. विरोधकही तसा आरोप करीत आहे. विकासकामांचा निधी अद्याप वितरित झाला नसल्याने विरोधकांच्या आरोपांना अधिक धार येण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजना सुरू केली. यातून प्रत्येक पात्र महिलेस 1500 रुपये रोख मिळणार आहे. तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत 60 वर्षावरील अर्ज करणाऱ्या प्रति महिलेवर तीर्थ क्षेत्र दर्शनसाठी 30 हजार रुपयापर्यंत खर्च करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांनाही 8 ते 12 हजार रुपये देण्याची घोषणा सरकारने केली आहे. या योजना थेट लाभाच्या आहेत.

या तीनही योजना निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे किमान निवडणुकीपूर्वी या सर्व योजना मिशन मोडवर राबविण्यात येणार आहे. या तीनही योजनांसाठी मोठ्याप्रमाणात निधी लागणार आहे. त्यामुळे योजनांना निधी कमी पडता कामा नये, याची काळजी घेण्याच्या सूचना शासनाने दिल्याचे समजते. प्रशासनाकडून या योजनांना प्राधान्य देण्यात येत आहे.

‘लाडकी बहीण’चे अर्ज घेऊन त्यातील अर्ज पात्र ठरविण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पहिला हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात वळता करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी अनेकांना 3 हजार रुपये बँकेच्या खात्यात जमा झाल्याचे मेसेज येऊन धडकले आहेत. त्याच प्रमाणे तीर्थदर्शनाचा लाभ मिळेल, अशी आखणी करण्यात येत आहे.

या योजनांवर निधी कमी पडता कामा नये, याची दक्षता शासनाकडून घेण्यात येत आहे. याला योजनांना प्राधान्य असल्याने काही विभागाच्या विकास कामांचा निधी तुर्तास रोखण्यात येणार आहे. विकास कामांना निधी हा दुसऱ्या टप्प्यात म्हणजे निवडणुकीनंतर मिळणार असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT