Modi Government : डॉक्टरांवरील हल्ल्यांबाबत मोदी सरकारचा महत्वाचा आदेश; बंगालमधील घटनेनंतर खडबडून जाग

Violence against Doctors MG Kar Medical College : सरकारी रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना हल्ले होण्याच्या घटना देशात सातत्याने घडत आहेत.
Violence Against Doctors
Violence Against DoctorsSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : पश्चिम बंगालमधील एमजी कर वैद्यकीय महाविद्यायातील ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून खून केल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. त्यातच महाविद्यालयात दोन दिवसांपूर्वी मोठा हिंसाचार झाल्यानंतर केंद्र सरकारला खडबडून जागा आली असून डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी महत्वाचा आदेश काढला आहे. देशातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टर किंवा इतर कर्मचाऱ्यांवर मारहाण झाल्यास त्याची सहा तासांच्या आत पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याची जबाबदारी संबंधित रुग्णालयाच्या प्रमुखांची असणार आहे. तक्रार न केल्यास त्याला प्रमुखांना जबाबदार धरले जाणार आहे.

Violence Against Doctors
Uddhav Thackeray : जागेवरून मारामाऱ्या, पाडापाडी! उध्दव ठाकरेंनी पवार, पटोलेंसमोर सांगितला पुढचा धोका

आरोग्य मंत्रालयाने आदेशात म्हटले आहे की, सरकारी रुग्णालयांतील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या घटना सातत्याने घडत आहेत. कामावर असताना आरोग्य कर्मचाऱ्यांवर हे हल्ले होत आहेत. अनेकांना धमकावले जात असून शिवीगाळही केली जाते. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून असे प्रकार होत आहेत. यापार्श्वभूमीवर ड्युटीवर असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांबाबतची कोणतीही हिंसा घडल्यास संबंधित सस्थेच्या प्रमुखाने सहा तासांच्या आत पोलिसांत तक्रार करावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

बंगालमधील शासकीय रुग्णालयात ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि खूनाच्या घटनेनंतर हा आदेश काढण्यात आला आहे. या घटनेबाबत तक्रार करण्यास आणि गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याचा आरोप होत आहे. पीडितेच्या पालकांसह देशभरातील ट्रेनी डॉक्टर, तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Violence Against Doctors
J&K Assembly Election 2024 : अखेर 6 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर जम्मू-काश्मीरची विधानसभा गजबजणार; ‘370’ चा करिष्मा चालणार का?

दोन दिवसांपूर्वी रात्री अडीच ते तीन हजार लोकांच्या जमावाने एमजी कर वैद्यकीय महाविद्यालयासमोर निदर्शने केली होती. जमावातील काहींनी रुग्णालयात घुसून प्रचंड नासधूस केली. काही डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोपही होत आहे. त्यावरूनही सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याची दखल घेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तातडीने पावले उचलत ‘एफआयआर’बाबत आदेश काढला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com